Red Diamond Guava: तिप्पट उत्पन्न आणि चवीला मधुर जपानी रेड डायमंड पेरुची ‘अशी’ करा शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: रेड डायमंड पेरु (Red Diamond Guava) शेतकर्‍यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या पेरुचा दर खूप जास्त असून, बाजारात 100 ते 150 रुपये किलोने विकला जातो. हा पेरु त्याच्यातील चव आणि गोडवा यासाठी खूप लोकप्रिय आहे. या पेरुची (Red Diamond Guava) लागवड करून शेतकरी काही वर्षांत श्रीमंत होऊ शकतात.

भारतातील बहुतेक शेतकरी पारंपारिक शेतीऐवजी अपारंपारिक पिकांची लागवड करत आहेत.  या प्रयत्नात ते यशस्वी होत आहेत आणि चांगली कमाई करत आहेत. बहुतांश शेतकरी विविध प्रकारच्या फळांची लागवड करतात. आजकाल रेड डायमंड पेरू (Red Diamond Guava) देशातील शेतकर्‍यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जपानी रेड डायमंड पेरुचा (Japanese Red Diamond Guava) दर खूप जास्त आहे, बाजारात 100 ते 150 रुपये किलो दराने विकला जातो. देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकर्‍यांनी या जातीच्या पेरुची लागवड करण्यास सुरुवात केली असून त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

या लेखा द्वारे जाणून घेऊ या, लाल डायमंड पेरुची लागवड पद्धती (Red Diamond Guava Farming)

योग्य हवामान आणि माती

रेड डायमंड पेरुच्या लागवडीसाठी (Red Guava Cultivation) 10 अंश ते 42 अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. परंतु तापमान थोडे कमी झाले तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होत नाही. या जातीच्या पेरुच्या लागवडीसाठी काळी किंवा वालुकामय चिकणमाती चांगली मानली जाते, तसेच जमिनीचा PH (सामू) 7 ते 8 असावी.

रोप लागवड आणि रोपातील अंतर

जपानी रेड डायमंड पेरुची (Red Diamond Guava) रोपे लावताना तुम्हाला त्यांच्यामधील जागेची विशेष काळजी घ्यावी लागेल. एका ओळीपासून दुसर्‍या ओळीपर्यंतचे अंतर सुमारे 8 फूट ठेवावे आणि रोपापासून रोपापर्यंतचे अंतर 6 फूट ठेवावे. चांगल्या वाढीसाठी शेतकर्‍यांना वर्षातून दोनदा रोपांची छाटणी करावी लागते. जेव्हा त्याचे फळ चिकूच्या आकाराचे होते तेव्हा आपण ते फळ पिशवी किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवावे. असे केल्याने पेरू पिकण्याची प्रक्रिया सुधारते आणि फळांवर डाग दिसत नाहीत.

खत आणि सिंचन

रेड डायमंड पेरुची लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेणखत आणि गांडूळखत यांचा पिकांमध्ये वापर करावा. याशिवाय, एनपीके सल्फर, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन यासारखी रासायनिक खते वापरू शकता. रेड डायमंड पेरुच्या झाडांना पाणी देण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात. याशिवाय वेळोवेळी सामान्य सिंचन देखील आवश्यक आहे.

रेड डायमंड पेरू (Red Diamond Guava) पासून होणारी कमाई

जपानी रेड डायमंड पेरू सामान्य पेरुसारखा दिसतो. पण आतून तो टरबूजासारखा लाल असतो आणि बाहेरून तो नाशपातीसारखा गोड असतो. बाजारपेठेत स्थानिक पेरुचा भाव 50 ते 60 रुपये प्रति किलो तर जपानी रेड डायमंड पेरू 100 ते 150 रुपये किलो दराने (Red Diamond Guava Rate) विकला जातो. या पेरुची लागवड करून शेतकरी सामान्य पेरूपेक्षा 3 पट अधिक उत्पन्न मिळवू शकतात. या जातीच्या पेरुची लागवड करण्यासाठी खर्च सुद्धा कमी येतो.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.