Jayakwadi Dam : जायकवाडीचा पाणीसाठा 5 टक्क्यावर; गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी जलसाठा!

Jayakwadi Dam Water Level
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई (Jayakwadi Dam) जाणवत आहे. गेल्याच आठवड्यात राज्यातील दुसरे सर्वात मोठे धरण असलेले उजनी धरण इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळीवर पोहचले असल्याचे समोर आले होते. 1980 साली यापूर्वी उजनी धरणाने 44 वर्षातील सर्वात निच्चांकी पातळी ओलांडली गाठली होती. अशातच आता राज्यात प्रमुख धरण असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघ्या पाच टक्के पाणीसाठ्यापर्यंत घसरला आहे. गेल्या पाच वर्षात मे महिन्याच्या अखेरीस जायकवाडीचा (Jayakwadi Dam) असलेला हा सर्वात कमी जलसाठा आहे. यामुळे सध्या मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगरसह 400 गावांना पाणीपुरवठा (Jayakwadi Dam Water Level)

छत्रपती संभाजीनगर शहरासह जवळपास 400 गावांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यातून सुमारे ४० लाख नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र गेल्या वर्षी कमी पाऊस पडला, परिणामी हे जायकवाडी धरण पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पाण्याचे रोटेशन आणि पाणी पुरवठा योजनेसाठी करण्यात येणारा उपसा यामुळे धरणातील पाणी पातळी कमी कमी होत गेली आहे. जी सध्या पाच टक्क्यांपर्यंत खाली आहे.

मे अखेरपर्यंत साठा झाला कमी

पाऊस कमी झाल्याने यंदा मराठवाड्यासह राज्यस्तील अनेक भागांमध्ये दुष्काळाचे सावट सर्वत्र घोंगावत होते. यात धरणात असलेला पाणी साठा बाष्पीभवनामुळे कमी होत गेला. परिणामी जायकवाडी धरणात सद्यस्थितीला केवळ ५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. मे महिना अखेरपर्यंत साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, मागील पाच वर्षातील हा सर्वात कमी साठा असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

विभागात केवळ 8.74 टक्के पाणीसाठा

दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्यातील सहाही जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, सध्या मराठवाडा विभागातील मोठ्या 44 प्रकल्पात केवळ 8.74 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. अशातच जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील पाच टक्क्यांपर्यंत घसरला आहे. यामुळे मराठवाड्यात पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.