John Deere Tractor : शेतकऱ्यांसाठी 63 एचपीचा जॉन डियरचा शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा.. किंमत, वैशिष्ट्ये?

John Deere Tractor For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जॉन डियर ट्रॅक्टर ही कंपनी भारतीय शेतकऱ्यांमध्ये (John Deere Tractor) विशेष लोकप्रिय आहे. जॉन डीयर ट्रॅक्टर कंपनीचे तुम्हाला अनेक शक्तिशाली ट्रॅक्टर पाहायला मिळतात. जे सर्व प्रकारच्या शेती कामासाठी जबरदस्त काम करतात. मात्र, आज आपण कंपनीच्या अधिक वजन उचलण्याची क्षमता असलेलया ‘जॉन डियर 5405 गिअर प्रो’ या बलशाली ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा शक्तीशाली ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ‘जॉन डियर 5405 गिअर प्रो’ हा ट्रॅक्टर (John Deere Tractor) तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

‘जॉन डियर 5405 गिअर प्रो’ बद्दल (John Deere Tractor For Farmers)

‘जॉन डियर 5405 गिअर प्रो’ ट्रॅक्टरमध्ये (John Deere Tractor) तुम्हाला 2900 सीसी क्षमतेसह 3 सिलिंडर पाहायला मिळतात. याशिवाय या ट्रॅक्टरचे इंजिन 63 एचपी पॉवर जनरेट करते. या जॉन डीअर ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पॉवर 55 एचपी आहे. याशिवाय या ट्रॅक्टरचे शक्तिशाली इंजिन 2100 आरपीएमची निर्मिती करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्राय टाईप, ड्युअल एलिमेंट एअर फिल्टरसह येतो. ज्यामुळे इंजिनचे धुळीपासून बचाव होतो. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची वजन 2000 किलो आणि त्याचे एकूण वजन 2280 किलो इतके आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर 2050 एमएम व्हीलबेसमध्ये 3515 एमएम लांबी आणि 1870 एमएम रुंदीसह तयार करण्यात आला आहे. या जॉन डीअर ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 425 एमएम ठेवण्यात आला आहे.

‘जॉन डियर 5405 गिअर प्रो’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

ट्रॅक्टर पॉवर स्टीयरिंगसह उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 12 आणि मागील बाजूस 4 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स दिला आहे. यामध्ये तुम्हाला ड्युअल क्लच पाहायला मिळतो. कंपनीने या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 2.0 ते 32.6 किमी प्रति तास आणि रिव्हर्स स्पीड 3.5 ते 22.9 किमी प्रति तास ठेवला आहे. हा जॉन डीअर ट्रॅक्टर ऑइल इमर्स्ड डिस्क ब्रेकसह येतो. या जॉन डीअर ट्रॅक्टरमध्ये स्वतंत्र, 6 स्प्लाइन, मल्टी स्पीड पॉवर टेकऑफ आहे. जे 540 @ 2100/1600 ERPM जनरेट करते. हा ट्रॅक्टर 2 व्हील ड्राइव्हमध्ये येतो. या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 6.5 x 20 आकारात तर मागील बाजूस 16.9 x 30 / 16.9 x 28 आकारात टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

‘जॉन डियर 5405 गिअर प्रो’ एक्स-शोरूम किंमत 8.70 लाख ते 10.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या जॉन डियर ट्रॅक्टरची ऑन-रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या रोड टॅक्समुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 5000 तास किंवा 5 वर्ष जे अगोदर संपेल, इतकी वॉरंटी प्रदान केलेली आहे.