हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या खरीप पिकांची (Kharif Crop Management) पेरणी पूर्ण झालेली आहे तर काही ठिकाणी ती सुरु आहे. वेगवेगळ्या खरीप व फळ पिकात आंतर मशागतीची कामे, कीड आणि रोग नियंत्रण फवारणी, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर व इतर कामे सुरु आहेत. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी (Agri Expert Recommendations) पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थेत काय काळजी घ्यावी याबद्दल शिफारस केलेली आहे. जाणून घेऊ या सविस्तर याविषयी (Kharif Crop Management).
खरीप पिकाचे नियोजन (Kharif Crop Management)
- कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा (Cotton Sucking Pests) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
- कापूस पिकाची (Cotton Crop Management) लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसाला 31 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापसाला 52 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी.
- कापूस पिकात (Kharif Crop Management) पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कापूस पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहीत ठेवावे.
- सूक्ष्म अन्नद्रव्याच्या (Micro Nutrients Deficiency In Crop) कमतरतेमुळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
- तूर पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे (Intercultural Operations) करून पीक तण विरहीत ठेवावे. तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- मूग/उडीद पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहीत ठेवावे. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- मूग/उडीद पिकात (Kharif Crop Management) मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची पावसाची उघड बघून फवारणी करावी.
- उडीद पिकात करपा रोगाचा (Anthracnose Disease) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. खोड माशीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25 ईसी किंवा मोनोक्रोटोफॉस 36 एसएल 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
- भुईमुग पिकात (Kharif Crop Management) जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहीत ठेवावे. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- मका पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून पीक (Kharif Crop Management) तण विरहीत ठेवावे. लष्करी अळीचा (Maize Army Worm) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघड बघून फवारणी करावी. फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मका पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
फळबागेचे व्यवस्थापन (Fruit Crop Management)
- केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. केळी बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेस 50 ग्रॅम यूरिया प्रति झाड खतमात्रा द्यावी.
- केळी बागेत मर व बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
- आंबा बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
- द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही (Kharif Crop Management) याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी.
- द्राक्ष बागेत मर व बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
- सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- सिताफळ बागेत मर व बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.