Kharif Crop Management: वेगवेगळ्या पिकांचे ऑगस्ट महिन्यात असे करा व्यवस्थापन; कृषी तज्ज्ञांचा सल्ला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक जोर दिसून (Kharif Crop Management) येत आहे. त्यानुसार वेगवेगळ्या पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV Parbhani) येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने हवामान आधारीत कृषि सल्ल्याची (Agriculture Advisory) शिफारश केली आहे. जाणून घेऊ या महिन्यात (August Month Crop Management) खरीप पिकांचे करायचे व्यवस्थापन (Kharif Crop Management).

वेगवेगळ्या पिकांचे व्यवस्थापन (Kharif Crop Management)

  • सोयाबीन (Soybean Pest Control) पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50%  400 मिली किंवा इथिऑन 50% 600 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) 50 मिली किंवा प्रादुर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक कीटकनाशक पावसाची उघड बघून फवारणी करावी.  
  • खरीप ज्वारी पिकाची (Kharif Crop Management) पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास 40 किलो नत्र प्रति हेक्टर खत मात्रा द्यावी.
  • खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा (Army Worm Management) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असताना कीटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
  • खरीप ज्वारी पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहीत ठेवावे.  
  • बाजरी पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहीत ठेवावे. 
  • ऊस पिकात हूमणीच्या (Sugarcane Cut Worm Management) अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. 
  • ऊस पि‍कावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
  • ऊस पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची (Sugarcane Micro Nutrients Deficiency)कमतरता दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम  किंवा 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.  
  • ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघड बघून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. 
  • हळद पिकात (Kharif Crop Management) कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघड बघून फवारणी करावी. 
  • मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत किडींचा (Citrus Pest Management) प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
  • मोसंबी बागेत ब्लॅक फ्लायचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिफेट 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी.
  • आंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत गुळवेल व वासन वेल दिसून येत असल्यास लवकरात लवकर काढून टाकावेत.
  • संत्रा/मोसंबी बागेत (Kharif Crop Management) फळगळ दिसून येत असल्यास  एनएए 15 पीपीएम ची पावसाची उघड बघून फवारणी करावी. 
  • डाळिंब बागेत किडींचा (Pomegranate Pest Control) प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.