Kharif Onion Management: अशा पद्धतीने करा उभ्या खरीप कांदा पिकाचे वेगवेगळ्या अवस्थेतील नियोजन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या खरीप कांदा लागवड (Kharif Onion Management) होऊन एक ते दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे. पीक वेगवेगळ्या अवस्थेत (Crop Stages) आहे. यावेळी पिकाला गरजेनुसार पोषक घटकांचा पुरवठा करणे गरजेचे असते. तसेच काही ठिकाणी आंतर मशागतीची कामे, तसेच कीड आणि रोग नियंत्रण करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या कांदा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेतील नियोजन (Kharif Onion Management).

खरीप कांदा पिकाचे नियोजन (Kharif Onion Management)

  • सध्या परतीचा पाऊस झाल्यामुळे करपा (Onion Anthracnose) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
  • पीक 30 दिवसाचे झाले असल्यास उभ्या पिकात नत्राची (Nitrogen Top Dressing) पहिली मात्रा @ 25 किलो/हेक्टर या प्रमाणात द्यावी.
  • लावणीनंतर 40-60 दिवसांनी पिकात हाताने खुरपणी करावी.
  • कांद्याच्या उभ्या पिकात नत्राची दुसरी मात्रा @ 25 किलो/हेक्टर लावणीनंतर 45 दिवसांनी द्यावी.
  • रोपे लावल्यानंतर 45, 60 आणि 75 दिवसांनी 5 ग्रॅम/लिटर सूक्ष्म पोषक मिश्रण (Micro Nutrient) पानातून फवारणीद्वारे  शिफारस केली जाते.
  • नायट्रोजन लीचिंगमुळे शेतात नायट्रोजनची कमतरता होते यामुळे पाने पिवळसर (Yellowing Of Leaves) दिसून येत असल्यास, नायट्रोजनची कमतरतेवर भरून काढण्यासाठी  युरिया @ 10 ग्रॅम/लिटर पाणी यांची पानांवर फवारणी करावी.
  • सततचा पाऊस, सापेक्ष आर्द्रता (85% पेक्षा जास्त) आणि ढगाळ स्थिती असल्यास, यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशावेळी बेनोमिल @ 0.2% ची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • बेनोमिल फवारणीनंतर 15 दिवसांनी मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम/ लिटर सोबत मेथोमाईल 0.8 ग्रॅम/लिटर सह दुसरी रोगप्रतिबंधक फवारणी करण्याची शिफारस केली जाते. यामुळे पानांवरील रोग आणि फुलकिडी यांचा प्रादुर्भाव सुद्धा टाळला जातो.  
  • फुलकिडी (Onion Thrips) आणि पानांवरील रोग वरील फवारणीद्वारे पूर्णपणे नियंत्रित न झाल्यास, प्रोफोनोफॉस 1 मिली/लिटर + हेक्साकोनाझोल @ 1 ग्रॅम/लिटरची दुसरी फवारणी केली जाऊ शकते आणि त्यानंतर फिप्रोनिल 1 मिली/लिटर ची फवारणी करावी. गरज भासल्यास प्रोपिकोनाझोल @ 1.0 ग्रॅम/लिटर पाणी याप्रमाणे आधीच्या फवारणीनंतर 15  दिवसांनी करावी (Kharif Onion Management).