Kharif Onion: यंदा खरीप कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढीचा अंदाज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी मंत्रालयाने राज्य सरकारांच्या सहयोगाने केलेल्या मूल्यांकनानुसार, कांदा (Kharif Onion), टोमॅटो व बटाटा या भाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात (Sowing Area) गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

यंदा मौसमी पाऊस (Timely Onset Of Monsoon) योग्य वेळेत चांगला सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी जोर धरला आहे. त्यामध्ये कांद्यासह (Kharif Onion) टोमॅटो आणि बटाट्याचाही समावेश आहे.

रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन (Rabi Onion Production)गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे कमी झाले असले तरीही देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता पुरेशी आहे. कांद्याचे पीक (Onion Crop) तीन हंगामात घेतले जाते; मार्च ते मे हा रब्बी हंगाम, सप्टेंबर ते नोव्हेंबर खरीपाचा आणि जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे उशिराचा खरीप हंगाम. पैकी रब्बी हंगामात एकूण उत्पादनाच्या 70% कांद्याचे उत्पादन होते तर, खरीप व उशिराच्या खरीप हंगामात मिळून 30% उत्पादन होते. रब्बी आणि खरीपाच्या सर्वोच्च उत्पादनाचा काळ यांच्या दरम्यान येणार्‍या कमी उत्पादनाच्या महिन्यांमध्ये कांद्याचा दर (Onion Rate) स्थिर ठेवण्यात खरीपाचा कांदा  (Kharif Onion) महत्त्वाची भूमिका बजावतो.

या वर्षी खरीप हंगामात 3.61 लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट असून हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% अधिक आहे.

कांद्याचे (Kharif Onion) सर्वोच्च उत्पादन घेणारे राज्य असलेल्या कर्नाटकात 1.50 लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट असून त्यातील 30% क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. इतर मोठ्या कांदा उत्पादक राज्यांमध्येही लागवडीचे प्रमाण चांगले आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा 2024 च्या रब्बी हंगामातील असून यंदा मार्च ते मे या कालावधीत गोळा केलेला आहे. 2024 च्या रब्बी हंगामातील 191 लाख टन कांदा निर्यातीवर दरमहा 1 लाख टनाची मर्यादा कायम ठेवल्यास देशांतर्गत बाजारपेठेतील सुमारे 17 लाख टनाची मासिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.

रब्बी हंगाम सुरू असताना व त्यानंतर रब्बीचे उत्पादन गोळा करताना यंदा हवामान कोरडे राहिल्यामुळे साठवणीत कांद्याचे (Onion Storage) नुकसान कमी करण्यास मदत झाली आहे.

शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात घेतलेला कांदा बाजारात आणल्यामुळे एकीकडे कांद्याची वाढलेली उपलब्धता आणि दुसरीकडे, मौसमी पावसाला सुरुवात झाल्यामुळे हवेतील आर्द्रतेत झालेली वाढ यामुळे साठवणीतील कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी कांद्याचे (Kharif Onion) दर स्थिरावत आहेत.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.