Lakdi Ghana Business : सध्या काळानुसार सर्व लोक बदलत आहेत तसेच लोकांची खाण्याची पद्धत लोकांची राहण्याची पद्धत थोडक्यात झालं तर लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलत चालली आहे. खाण्यापिण्याची राहण्याची पद्धत जरी बदलत असली तरी दुसरीकडे काही लोकांना पूर्वीसारखेच राहायला खायला आवडते. सध्या खाण्याच्या गोष्टीमध्ये भरपूर केमिकलयुक्त गोष्टींचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये लोक केमिकलचे तेल असेल किंवा इतर गोष्टी खाण्याला जास्त पसंती देतात. मात्र यामध्ये काही असे लोक आहेत जे केमिकलला कंटाळून जुन्या पद्धतीचे तेल काढणे पसंत करतात. आता जुन्या पद्धतीने तेल काढण्याची पद्धत म्हणजे नेमकी काय? तर याला लाकडी घाणा पद्धत असे म्हणतात. नमस्कार मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण लाकडी घाणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
तुमचा कोणताही व्यवसाय असेल तर ‘या’ अँप वरून करा मोफत जाहीरात
तुम्ही कोणताही शेतीनिगडीत व्यवसाय करत असाल तर हे मोबाईल अँप तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तुमची खताचे दुकान असो वा रोपवाटिका तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या. या अँपवर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची मोफत जाहिरात करता येते तसेच थेट ग्राहक शेतकऱ्याला तुम्ही तुमची वस्तू वा सेवा ऑनलाईन विकू शकता. यामध्ये तुमच्याकडे एखादे वाहन भाड्याने असेल, किंवा तुम्ही मजूर, वायरमन असाल तर हे अँप डाउनलोड करा. यामधली शेतकरी दुकान मध्ये अनेकी सुविधा देण्यात आल्या आहेत.
लाकडी घाणा म्हणजे नेमकं काय?
लाकडी घाणा म्हणजे ज्या घाण्यातून तेल काढले जाते. ते तेल काढण्यासाठी लाकडी भागाने ते तेल वेगळे केले जाते. याला लाकडी घाणा असे म्हणतात. आत्ताच्या काळामध्ये लाकडी घाण्यासाठी काही मशीनचा देखील वापर केला जातो. मात्र पूर्वीच्या काळामध्ये लाकडी घाण्यासाठी बैलाचा उपयोग करून घाणे फिरवले जायचे. मात्र सध्या आता बैलांची जागा मोटरने घेतलीली पाहायला मिळत आहे. Lakdi Ghana Business
लाकडी घाणातील उद्योग प्रक्रिया नेमकी कशी होते?
आता आपण जास्त जुन्या पद्धतीचा विचार केला तर जुन्या काळामध्ये साधारण १ पायलीचा घाणा असायचा म्हणजे त्यात ४ किलो धान्य असले तर त्यातून तेल काढण्यासाठी जवळपास चार तास लागायचे मात्र आता त्याची तुलना आजच्या दिवसाची केली तर आता 13 किलोचा घाणा असतो आणि हा घाणा काढण्यासाठी फक्त एक तास वेळ लागत आहे. त्यामुळे सध्या लोकांच्या वेळेची मोठी बचत होत असल्याचे दिसत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल घाणा तेल आणि रिफाईन तेल यामध्ये नेमका फरक काय?
तर तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. घाणा तेल आणि रिफाईन तेल यामध्ये खूप फरक आहे. रिफाईन तेल तयार करण्यासाठी यामध्ये जवळपास बारा ते तेरा प्रकारचे केमिकल्स वापरले जातात त्यामुळे ते केमिकल्स आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात. आपण जर रिफाईन तेलाचे सेवन करत असाल तर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील वाढते त्याचबरोबर घाणा या तेलामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्याला याचे नुकसान होत नाही आणि आपले शरीर देखील निरोगी राहते.
आहारामध्ये तेलाचे प्रमाण किती असावे?
आपल्या दैनंदिन आहारामध्ये तेलाचे हे प्रमाण कमीच असले पाहिजे एका व्यक्तीने दररोज दहा ते वीस ग्रॅम तेलाचे सेवन करावे याप्रमाणे चार व्यक्तींचे जर कुटुंब असेल तर त्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. जर आपण आहारात मध्ये रिफाईन 200 ग्रॅम तेल वापरत असाल तर घाण्याचे तेल केवळ 75 ग्रॅम वापरावे लागते त्यामुळे आपले पैसे वाचतात आणि आरोग्य देखील निरोगी राहते.
जनावरांसाठीही फायदेशीर
तुम्ही जर एखाद्या दुकानदाराकडे लाकडी घाणाचे तेल बनवायला घेऊन गेला तर त्या ठिकाणी आपला जे शेंगदाणे सोयाबीन किंवा इतर काही तेलबिया असतील तर त्याची पेंड निघते. ती पेंड जनावरांसाठी खूप उपयुक्त असते. त्या पेंडीचा उपयोग तुम्ही जनावरांना टाकण्यासाठी करू शकता. जर तुम्ही बदामाचे घाना तेल काढून आणले असेल तर त्याचा उपयोग तुम्ही बिस्कीट बनवण्यासाठी करू शकता. Lakdi Ghana Business
तरुणांना मिळतोय रोजगार
सध्या अनेकजण लाकडी घाणा तेलाचा उद्योग करताना दिसत आहेत. यामध्ये जर बाजारपेठांचा अभ्यास करून व्यवस्थितरित्या तुम्ही हा उद्योग केला तर नक्कीच तुम्हाला यामधून चांगला नफा देखील मिळेल. सध्याचे अनेक तरुण हा व्यवसाय करत असल्याचे देखील दिसत आहेत. अनेक जिल्ह्यांमधील गावांमध्ये तरुण-तरुणी हा व्यवसाय करत आहेत आणि त्यातून चांगला नफा देखील मिळवत आहेत.
हा उद्योग उभारण्यासाठी किती खर्च येईल जाणून घेऊया थोडक्यात गणित
मित्रांनो तुम्हाला जर घाणा तेलाचा उद्योग उभारायचा असेल तर तुमच्याकडे २ लाख रुपये भांडवल असणे गरजेचे आहे. यासाठी सूर्यफूल, शेंगदाणे तेल साठवायला टाक्या त्याचबरोबर पॅकेजिंगसाठी बॉटल इत्यादी कच्चामाल लागेल. घाणा तेलासाठी ३Hp ची मोटर लागेल. या मोटरची किंमत एक लाख 37 हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी मनुष्यबळ देखील जास्त लागत नाही दोन ते तीन लोक हा उद्योग व्यवस्थितपणे हँडल करू शकतात.
घाना तेलाची तुम्ही विक्री कशी कराल
कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो तो म्हणजे आपल्या प्रॉडक्टची विक्री कशी करायची. तर तुम्हाला यासाठी जास्त टेन्शन घ्यायची नाही. जर तुम्ही घाणा तेल उद्योग सुरू केला तरी यासाठी तुम्ही वेगवेगळ्या किराणा दुकानात तुमचे प्रॉडक्ट ठेवून त्याची विक्री करू शकता. त्याचबरोबर मोठमोठ्या मॉलमध्ये तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ठेवून त्याची विक्री करू शकता याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.