बाजारात फळांच्या राजाची उशिरा एंट्री, रुबाब मात्र कायम , कोल्हापुरात हापूसला मिळाला विक्रमी दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: इतर पिकांप्रमाणे आंबा या पिकाला देखील अवकाळीचा फटका बसला. मोहरच गाळल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात देखील घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यंदा थोडी उशिरा का होईना फळांच्या राजाची बाजारात दमदार एंट्री झाली आहे . आता कोरोनाचे वातावरण देखील निवळले आहे. कोल्हापूरच्या बाजरात हापूस आंब्याची एंट्री झाली असून ५ डझनाच्या पेटीला ४० हजार ५९९ इतका दर मिळाला आहे. सध्याचा हा दर सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर असला तरी लवकरच आवक वाढून सामान्य माणसाला देखील हापूसची चव चाखायला मिळेल.

दरम्यान कोकणात पिकणाऱ्या आंब्याला मुंबई आणि कोल्हापूरची मोठी बाजरपेठ लाभते. या दोन्ही शहरात सर्वात आधी आंबा दाखल होतो. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची एंट्री झाली होती त्यानंतर आता कोल्हापुरात हापूसची एंट्री झाली आहे. याकरिता ५ डझन आंब्याच्या पेटीला ४० हजार ५९९ इतका भाव मिळाला आहे म्हणजेच एका आंब्याचा भाव ६७६ इतका आहे. यंदा निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. १५ जूनपर्यंत आवक सुरु राहणार असल्याने खवय्यांना चव चाखता येणार आहे.