हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात अनेक भागात रांगडा कांद्याची लागवड (Late Kharif Onion Cultivation) होते कारण या हंगामात लागवड केलेल्या कांद्याची साठवणक्षमता (Onion Storage Capacity) खरिप हंगामापेक्षा उत्कृष्ट असते. रांगड्या कांद्याच्या लागवडीसाठी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये रोपवाटिका तयार केली जाते आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोपांची पुनर्लागवड केली जाते. जाणून घेऊ या रांगडा कांद्याचे (Late Kharif Onion Cultivation) सध्या करावयाचे व्यवस्थापन.
रांगडा कांद्याचे व्यवस्थापन (Late Kharif Onion Cultivation)
- एक एकर कांदा लागवडीसाठी (Onion Cultivation) दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी.
- एक एकर लागवडीसाठी दोन ते तीन किलो बियाणे पुरेसे आहे.
- पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया (Onion Seed Treatment) करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे.
- पेरणीपूर्वी 200 किलो शेणखतासोबत 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडी वापरून जमिनीत मिसळावे.
- रोपवाटिकेत ठिबक किंवा स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी जमिनीपासून 10 ते 15 सें.मी. उंच, 1 ते 1.2 मीटर रूंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते आणि पाणी फार काळ साचून राहत नाही, रोपे कुजत किंवा सडत नाहीत, लावणीच्या वेळी सहज उपटून काढता येतात, रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
- वाफे (Onion Nursery Bed) तयार करताना दर 1600 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पोटॅश प्रति 200 चौरस मीटर याप्रमाणे खते द्यावीत.
- रुंदीशी समांतर 5-7.5 सें.मी. अंतरावर एक रेघा पाडून 1-1.5 से.मी. खोलीवर बियाणे पेरावे.
- पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकून ठेवावे, नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे.
- पेरणीनंतर 20 दिवसांनी हाताने खुरपणी करून 800 ग्रॅम प्रति 200 चौरस मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.