हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 10 मे रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली तर दिनांक 11 मे रोजी लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील 2 ते 3 दिवस मराठवाडयात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 10 मे रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली तर दिनांक 11 मे रोजी लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते. नविन लागवड केलेल्या सीताफळ बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.

भाजीपाला
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज व खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भेंडी पिकावरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रीड 20% एसपी 1.5 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% ईसी 23 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल 2 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नागअळीच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलीप्रोल 10.26% ओडी 18 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.
