हॅलो कृषी ऑनलाईन : जुलै मध्ये दमदार बारसल्यानंतर आता राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सततच्या पावसामुळे खरीप पिके पाण्यातच आहेत. त्यामुळे यातून काही उत्पादन हातात पडेल की नाही ? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. तर आता अधिकच्या पावसामुळे तीबार पेरणी करावी लागली आहे. असे असतानाही शेतशिवारात पाणी साचल्याने उत्पादन बेभरवश्याचे झाले आहे. त्यामुळे आता पंचनामे आणि सर्व्हेक्षणचा सोपास्कार न करता थेट कसानभरापाई द्यावी अशीच मागणी वाशीम मधल्या शेतकऱ्यांमधून होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर च्या खरबी-पिंप्री,धोत्रा परिसरातील अडाण नदीला मोठा महापूर आल्याने नदी काठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली बुडाली आहे. सततच्या पावसामुळे केवळ पिके पाण्याखाली गेली नसून जमिनीच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाणार की काय अशी भीती आता इथल्या शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे आता कोणतीही औपचारिकता न करता थेट आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेती करावी कशी ?
मराठावाड्याबरोबर आता विदर्भातही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली मात्र, गतवर्षी हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी नुकसान झाले होते यंदा सुरवातीलाच न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. रब्बीत उत्पादन घटले आणि खरिपात पिकेच पाण्यात आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय करावा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.