हॅलो कृषी ऑनलाईन: गेले काही दिवस पावसाने राज्यात (Maharashtra Rain Update) विश्रांती (Monsoon Break) घेतलेली होती. गणपती विसर्जनावर पावसाची वृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला होता पण पावसाने काही भागातच हलकी हजेरी लावली होती. आता छोट्या ब्रेकनंतर परत एकदा पाऊस परतण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि छत्तीसगडच्या भागात सक्रीय झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात धुवादार पावसाचा इशारा (Heavy Rainfall) देण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या आणि मध्य स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे (Maharashtra Rain Update) .
राज्यात पुढील 48 तासांत महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे.
पुढील काही दिवस असा असणार पाऊस (Maharashtra Rain Update)
20 सप्टेंबर रोजी जळगाव जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
21 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट (Monsoon Yellow Alert) देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
22 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे.
कोकण, मध्य, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भासह बाकीच्या भागातही पाऊस बरसेल. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
IMD ने पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. गंगा डेल्टा आणि बांगलादेशाजवळील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशांमध्ये अतिवृष्टी होत आहे.