Maharashtra Weather Forecast: विश्रांतीनंतर राज्यात परत एकदा पावसाचा अंदाज; ‘या’ भागासाठी येलो अलर्ट जाहीर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस परत एकदा राज्यात (Maharashtra Weather Forecast) परतणार असल्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात वेगवेगळ्या भागात रिमझिम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे (IMD) वर्तविण्यात आलेला आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) यलो अलर्ट (Yellow Alert Of Monsoon) देण्यात आला आहे (Maharashtra Weather Forecast).

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (IMD Mumbai) येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा (Marathwada Monsoon) विभागात 17 व 18 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड जिल्ह्यात तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वि‍जांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किमी) राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात काही ठिकाणी पुढील  तीन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन तीन दिवसानंतर कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे (Maharashtra Weather Forecast).

विदर्भात (Vidarbha Monsoon) 17 ते 20 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह मेघगर्जना आणि वि‍जांचा कडकडाट (Thunder and Lightning) होण्याची शक्यता आहे.

कोकण (Konkan Monsoon) आणि मध्य महाराष्ट्र येथे सुद्धा 20 ऑगस्ट पर्यंत मेघगर्जना आणि वि‍जांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हल्का पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे. पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल (Maharashtra Weather Forecast).