महाराष्ट्रातील पहिली सौर बाजार समिती बार्शीत ; लाईट बिलापासून मिळणार मुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातील बार्शीतल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्रातील पहिली संपूर्ण सौर कृषी उत्पन्न बाजार समिती होण्याचा मान मिळाला आहे. बार्शीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला दरवर्षी 50 लाख रुपयांच्या लाईट बिलापासून मुक्ती तर मिळणार आहे. शिवाय बाजार समितीतल्या कोल्ड स्टोरेजमध्ये शेतकऱ्यांना अल्प दरात आपला माल ठेवता येणार आहे. या कोल्ड स्टोरेजचे उदघाटन आज करण्यात आले.

राज्य सरकारने सौर ऊर्जेचा प्रकल्प बाजार समितीत राबवण्यासाठी राज्यभरातल्या बाजार समित्यांना आवाहन केले होते. मात्र, बार्शीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वयंपूर्ण असे 96 किलोवॅटचे सौरऊर्जेचा प्रकल्प सुरू करून बाजार समितीला प्रकाशमान करण्याचे काम केले आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास पन्नास लाखांचा खर्च आलेला आहे. या प्रकल्पातील कोल्ड स्टोरेज मुळे शेतकऱ्यांना आपला माल कमी किमतीमध्ये साठवून ठेवता येणार आहे.