Maize Variety: वेगवेगळ्या कालावधीत पक्व होणारे ‘हे’ आहेत मक्याचे सुधारित वाण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात मका (Maize Variety) तृणधान्य म्हणून खरीप व रब्बी हंगामात (Kharif And Rabi Season Maize) घेतली जाते. यात उपयुक्ततेनुसार काही मक्याचे वाण (Maize Uses) तृणधान्य म्हणून पशुखाद्य व कुक्कुट खाद्य आणि प्रक्रिया उद्योगात वापरली जाते. तर काही वाण जनावरांचा चारा (Animal Fodder) तसेच काही बेबी कॉर्न,(Baby Corn), स्वीट कॉर्न (Sweet Corn) तर काही पॉपकॉर्न म्हणून लागवड केले जाते. मक्याच्या वाणानुसार त्याचा पक्व होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. जाणून घेऊ या वेगवेगळ्या कालावधीनुसार मक्याचे सुधारित वाण (Maize Variety).  

मक्याचे सुधारित वाण (Improved Maize Variety)

महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या काही मक्याच्या संमिश्र व संकरीत वाणांची (Maize Hybrid Variety) माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊ या

अ) उशिरा पक्क होणारे संकरीत वाण (100 ते 110 दिवस) (Late Matured Variety Of Maize)

  • बायो- 9681: पिवळा दाणा असलेला मक्याच्या या वाणाचे (Maize Variety) सरासरी धान्य उत्पादन 60 ते 70 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • एच क्यु पी एम-1: हा वाण पिवळा दाणा असलेला, अर्ध खळीदार, गुणात्मक संकरित वाण, करपा व खोडकिडीस प्रतिकारक आहे. या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन 60 ते 65 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • एच क्यु पी एम-5 नारंगी दाणा असलेला हा मक्याचा गुणात्मक संकरीत वाण आहे. हा वाण करपा व खोडकिडीस प्रतिकारक असून सरासरी धान्य उत्पादन 55 ते 60 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • संगम: नारंगी दाणा असलेल्या या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन 75 ते 80 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • कुबेर: नारंगी पिवळा दाणा असलेल्या या वाणाचे (Maize Variety) सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) 75 ते 80 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.

ब) मध्यम कालावधीत पक्क होणारे वाण (90 ते 100 दिवस) (Medium Period Matured Variety)

  • राजर्षि: नारंगी पिवळा दाणा असलेला हा वाण (Maize Variety) करपा व खोडकिडीस प्रतिकारक असून खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य आहे. या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन 70 ते 75 (खरीप) आणि 95 ते 100 (रब्बी) किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • बायो-9637: नारंगी दाणा असलेल्या या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन हे 70 ते 75 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • फुले महर्षि: नारंगी पिवळा दाणा असलेला हा वाण, अर्ध खळीदार, खरीप हंगामासाठी योग्य आहे. या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) 75 ते 80 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • लवकर (80 ते 90 दिवस) व अति लवकर पक्क होणारे वाण (70 ते 80 दिवस) (Early Matured Variety Of Maize)
  • पुसा संकर मका-1: नारंगी पिवळा दाणा असलेला हा वाण, खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आलेला असून याचे सरासरी धान्य उत्पादन 40 ते 50 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • विवेक संकरीत मका-21: पिवळा दाणा असलेला हा वाण, अर्ध खळीदार असून याचे सरासरी धान्य उत्पादन 45 ते 50 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • विवेक संकरीत मका-27: पिवळा दाणा असलेले हे वाण, अर्ध खळीदार असून याचे सरासरी धान्य उत्पादन 50 ते 55 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
  • महाराजा: नारंगी दाणा असलेल्या या वाणाचे (Maize Variety) सरासरी धान्य उत्पादन 60 ते 65 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.

ड) संमिश्र वाण उशिरा पक्व होणारे वाण (100 ते 110 दिवस) (Mixed Variety Of Maize)

  • आफ्रिकन टॉल: हा वाण (Maize Variety) हिरव्या चाऱ्यासाठी उत्तम असून याची पाने लांब, 10 ते 12 फूट उंच असून हा वाण करपा रोगास प्रतिकारक आहे. सरासरी उत्पादन 60 ते 70 टन हिरवा चारा (40 ते 50 क्वि. धान्य) प्रति हेक्टर एवढे आहे.
  • मधु मका वाण: या वाणाला (Maize Variety) फुले मधू असे सुद्धा म्हणतात. यात साखरेचे प्रमाण (ब्रिक्स) 14.89% असते. हिरवी कणसे 80 ते 85 दिवसात काढणीस तयार होतात. सरासरी धान्य उत्पादन खरीप हंगामात 125 ते 130 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे. (हिरवी कणसे आवरणसहीत)