हॅलो कृषी ऑनलाईन: आंब्याची झाड (Mango Rejuvenation) जसजशी मोठी होतात, त्याचा विस्तार वाढतो. सूर्यप्रकाश, हवासुध्दा खेळती राहत नाही. त्यामुळे फलधारणा झाडाच्या शेंड्यालगत होत नाही, आंब्याचे उत्पादन (Mango Production) कमी होते. अशा जुन्या झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणात वाढतात, त्यामुळे फांद्यांना अन्नपुरवठा कमी होऊन ती सुकतात. 10 वर्षापेक्षा मोठी असलेल्या आंब्याच्या (Mango) झाडांची वेळोवेळी छाटणी (Mango Training And Pruning) करून झाडाचा विस्तार आटोपशीर व मर्यादित ठेवून पाने व फांद्या अधिक सशक्त व जोमदार बनविणे गरजेचे असते यालाच आंब्याचे पुनरूज्जीवन (Mango Rejuvenation) करणे असे म्हणतात.
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने (Dr. Balasaheb Sawant Konkan Krushi Vidyapith) आंबा बागांचं पुनरूज्जीवन (Mango Rejuvenation) करण्याची शिफारस केली आहे. जाणून घेऊ या आंबा पुनरूज्जीवन कसे करायचे याविषयी.
असे करा व्यवस्थापन (Mango Rejuvenation Technique)
- झाडाच्या मध्ये फांदीची छाटणी करावी. तसेच मोठ्या झाडाच्या एक तृतीयांश फांद्यांची छाटणी करावी.
- छाटणी केलेल्या फांद्यावर येणाऱ्या पालवीचे काटेकोरपणे नियोजन करावे.
- खोडकिडा (Stem fly) व इतर रोगांपासून संरक्षण करावे.
- झाडांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करावे. संजीवकांचा योग्य प्रकारे वापर करावा. गरजेनुसार पाणी द्यावे.
- फळगळतीचे (Mango Fruit Drop) योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे. झाडांची छाटणी शक्यतो ऑक्टोबर किंवा मार्च महिन्यात करावी.
- शक्यतो ज्या झाडांपासून कमी उत्पादन मिळते, ज्या बागेतील झाडे खूप उंच वाढली आहेत, त्या बागांमध्ये फवारणी, फळांची काढणी इत्यादी काम निटपणे करणे अवघड झाले आहे, तसेच शास्त्रीय वाढ अत्यंत घट्ट झाल्यामुळे सूर्यप्रकाश झाडातील आंतील भागापर्यंत पोहोचत नाही, अशा बागा निवडाव्यात.
- डोंगरउतारावर वसलेल्या बागांमध्ये रोग आणि किडीचा प्रादूर्भाव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होतो. फवारणी करूनही तो आटोक्यात येत नाही. अशा बागा पुनरूज्जीवनासाठी योग्य असतात.
- शिवाय ज्या बागांमधील झाडे अशक्त आहेत, झाडांच्या फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि उत्पादकता कमी झाली आहे, अशा बागांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे.
- तसेच ज्या बागांमध्ये योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झालेले नाही आणि पीक संरक्षण (Mango Protection) उपाय योजना केलेल्या नाहीत, अशा उत्पादकता अत्यंत कमी झालेल्या बागा पुनरूज्जीवनासाठी (Mango Rejuvenation) योग्य असतात.
- निकषानुसार छाटणीसाठी योग्य झाडांची निवड करावी लागते. सर्वसाधारणपणे तिसऱ्या वाढीव फांद्यांची छाटणी करावी.
- ज्यांची छाटणी करायची आहे त्या फांद्यावर योग्य उंचीची खूण करावी. जुन्या आणि उंच झाडांची छाटणी बुंध्यापासून दोन तृतियांश उंचीवर करावी.
- कमी वयाच्या आणि कमी उंचीच्या झाडांची छाटणी 12 ते 15 फूट उंचीवर करावी. कमी उंचीवरील फांद्यांची छाटणी चेन सॉ किंवा करवतीने करावी. उंच फांद्याची छाटणी करण्यासाठी पोल प्रूनरचा वापर करावा.
- छाटणी करताना काप तिरका असावा, जेणेकरून त्यावर पावसाचं पाणी थांबणार नाही.
छाटणीनंतरची काळजी (Care After Mango Rejuvenation)
- छाटणी केलेल्या बागेतल्या फांद्या गोळा करून बाग स्वच्छ करावी.
- छाटणी केलेल्या झाडांवर क्लोरोपायरीफॉस (Chlorpyrifos) हे कीटकनाशक 5 मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारून संपूर्ण झाड भिजवून घ्यावे.
- झाडे भिजवून झालेनंतर एक लिटर ब्लॅक जपान डांबरामध्ये कार्बेन्डेझिम (Carbendazim) 2.5 ग्रॅम भुकटी मिसळून ते कापलेल्या फांद्यांच्या टोकाशी लावावे.
- तसेच क्लोरोपायरीफॉसचे द्रावण छाटणी केलेल्या झाडांना सुरुवातीला पाणी द्यावे.
- प्रत्येक झाडाला 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 150 ते 200 लिटर पाणी द्यावे.
- छाटणी केलेल्या खोडाच्या भागावर 3/5 फुटवे ठेवून बाकीचे फुटवे काढून टाकावेत.