हुर्ररे …! केरळात मान्सूनची एंट्री, लवकरच राज्यातही आगमन

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये मान्सूनची एंट्री झाल्याची आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. काळ २ जून रोजी पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता त्यानुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

राज्यातही मन्सूनसाठी पोषक वातावरण

याबाबतची माहिती देताना हवामान विभागाने म्हंटले आहे की, ‘दाक्षिकडील मान्सून आज ३ जून २०२१ रोजी केरळच्या दक्षिण भागात बरसला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता तळकोकणातही तो लवकरच दाखल होईल असा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टी, कर्नाटक, महाराष्ट्र, किनारी आंध्रप्रदेश आणि आसपासच्या प्रदेशात मान्सूनचा पाऊस पडेल. येत्या २ आठवड्यामध्ये मान्सून मध्य भारत व्यापून टाकेल असा मुंबई अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मान्सूनसाठी वातावरण पोषक असल्याचे देखील हवामान खात्याने म्हंटले आहे.

यंदा मान्सून जोरदार बरसणार

भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून जोरदार बरसणार असल्याची माहिती दिली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार यंदा कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसा पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.