हॅलो कृषी ऑनलाईन: नैऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात (Monsoon In Maharashtra) आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे (IMD Pune) शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Monsoon Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Monsoon In Maharashtra) कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यात (Maharashtra) अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन (Monsoon In Maharashtra) झाले आहे. राज्यातील शेतकर्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर आज पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात मॉन्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळत होता.
आज आणि उद्या राज्यात जोरदार पावसाची शक्यता (Monsoon In Maharashtra)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाने केळीच्या बागांना फटका
राज्यातील अनेक भागात मॉन्सूनपूर्व पावसाने (Pre Monsoon Rain) हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. याचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरू होत्या. संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.