हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज (Monsoon In Maharashtra) जाहीर केलेला असून त्यानुसार आज 5 ऑगस्टला पुणे आणि सातारा जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी सूचना देण्यात आलेल्या आहेत (Monsoon In Maharashtra) .
आज कोकण, नाशिक आणि कोल्हापूर, विदर्भातील काही भागात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उद्या 6 ऑगस्ट रोजी पुणे, सातारा रायगड, रत्नागिरी व विदर्भात यलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सामान्य पावसाचा (Normal Monsoon) अंदाज आहे (Monsoon In Maharashtra) .
पुणे, सातारा, कोकण आणि विदर्भातील काही भागात 8 ऑगस्ट पर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
9 ऑगस्टला पुणे, रायगड, ठाणे, वर्धा आणि चंद्रपूर येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पावसाची शक्यता आहे (Monsoon In Maharashtra) .
देशातील पावसाचा अंदाज
उत्तराखंडच्या (Uttarakhand Monsoon Update) विविध भागात 07 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने (IMD) उत्तराखंडमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तसेच काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
आज पंजाब, हरियाणा-चंडीगड आणि दिल्लीच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम राजस्थानमध्ये 06 आणि 07 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गोवा आणि गुजरातमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 9 ऑगस्टपर्यंत सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे.