हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात मॉन्सूनला (Monsoon In Maharashtra) सुरुवात होताच पावसाने ओढ दिल्याचे चित्र दिसून येत असून मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह मराठवाड्यात पावसाने ‘ब्रेक’ (Monsoon Break) घेतला आहे. दरम्यान, कोकणासह मुंबई, पुणे, साताऱ्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात जोरदार पावसाचा अलर्ट (Monsoon In Maharashtra) देण्यात आला आहे.
चक्राकार वाऱ्यांची (Whirling Wind) स्थिती सध्या ईशान्य अरबी समुद्राला जोडून सौराष्ट्रापर्यंत असून बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य भागात सक्रिय आहे. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची (Light Rain) शक्यता आहे.
आज 19 जून ते 21 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुफान पावसाची (Monsoon In Maharashtra) शक्यता असून आज पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख (IMD Pune) के.एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी सांगितले.
खालील जिल्ह्यांना यलो अलर्ट? (Yellow Alert in Maharashtra)
आज संपूर्ण विदर्भाला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा (Heavy Rain Alert) अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग 45 ते 50 किमी प्रति तास राहणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस राहण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम, यवतमाळ
मध्य महाराष्ट्रात आज बहुतांश ठिकाणी हलक्या सरींच्या पावसाची शक्यता असून सातारा व पुणे जिल्ह्यास जोरदार पावसाचा अलर्ट आहे.
कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असून या जिल्ह्यांना पावसाचा (Monsoon In Maharashtra) यलो अलर्ट देण्यात आला आहे.