हॅलो कृषी ऑनलाईन: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त (Monsoon In Marathwada) झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात आज दिनांक 26 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर दिनांक 27 जून रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर दिनांक 28 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर दिनांक 29 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची (Monsoon In Marathwada) शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ERFS) मराठवाडयात (Marathwada) दिनांक 28 जून 04 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, (SAC) इसरो (ISRO) अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाडयात (Monsoon In Marathwada) बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 जून ते 06 जुलै 2024 दरम्यान पाऊस (Monsoon In Marathwada) सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
पेरणी केव्हा करावी?
मराठवाडयात ज्या तालुक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास जसे परभणी जिल्ह्यातील पूर्णा, हिंगोली येथील वसमत, सेनगाव, लातूर जिल्ह्यातील जळकोट, व नांदेड जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, हिमायतनगर, उमरी, नायगाव) येथील शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालुक्यातील शेतकर्यांनी पेरणी (Kharif Sowing) करण्यास हरकत नाही.
मॉन्सूनचा (Monsoon Rain) पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV Parbhani) येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिला आहे.