Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत झाले मोठे बदल; मिळेल अधिकाधिक महिलांना लाभ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जास्तीत जास्त महिलांना लाभ घेण्यात यावा यासाठी या योजनेत काही बदल करण्यात आलेले आहे. याबाबत मुख्यमंत्री (Chief Minister Maharashtra) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घोषणा केलेली आहे. जाणून घेऊ या योजनेत झालेले महत्त्वाचे बदल.   

योजनेत केलेले बदल (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

  • या योजनेत 60 वर्षांची वयोमर्यादा आता 65 वर्षे करण्यात आलेली आहे, तसेच  योजनेच्या पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
  • या योजनेत (Government Schemes) लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल. आधी ही मुदत 15 जुलैपर्यंत होती.
  • आधी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते. आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
  • योजनेतून (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • अडीच लाख रूपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.
  • यात कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार येणार आहे.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणार्‍या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज नाही
● मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) शासन निर्णयही लगेचच काढला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रुपये तरतूद केली आहे.

● अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा बीपीएलचा जो डेटाबेस आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.