हॅलो कृषी ऑनलाईन: काही तरुण त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरवठा (Success Story) करण्यासाठी प्रचंड मेहनत तर घेतातच शिवाय वेळ प्रसंगी मोठे ध्येय गाठण्यासाठी (Success Story) आर्थिक गोष्टींचा सुद्धा विचार करत नाहीत.
जोधपुर येथील निर्मल चौधरी (Nirmal Choudhary) असाच एक प्रेरणादायी तरुण आहे ज्याने स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि यशस्वी व्यवसाय (Success Story) उभारण्यासाठी धाडसी निर्णय घेतला.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतल्यानंतर निर्मल चौधरी यांनी तीन वर्षे UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं नाही म्हटल्यावर त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारली. पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी 35 लाखांची नोकरी सोडून 2021 मध्ये ‘मिल्क स्टेशन’ (Milk Station Station) नावाची डेअरी कंपनी सुरू केली (Success Story).
ऊंटाच्या दुधावर आधारित उत्पादने
मिल्क स्टेशन कंपनी ऊंटाच्या दुधापासून (Camel Milk ) बनवलेली विविध प्रकारची उत्पादने विकते (Success Story). यात तूप, ताक, लस्सी, पनीर, दही आणि कुकीजचा (Camel Milk Products) समावेश आहे. ऊंटाच्या दुधाचा वापर करण्यामागे निर्मल यांचा उद्देश म्हणजे ऊंट प्रजननाला चालना देणे आणि सामाजिक प्रभाव पाडणे.
यशस्वी व्यवसाय (Success Story)
मिल्क स्टेशनची उत्पादने उच्च दर्जाची आणि रसायनमुक्त असल्यामुळे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. सुरुवातीला कंपनीची पोहोच जोधपुर आणि आसपासच्या भागात मर्यादित होती, परंतु आता त्यांची उत्पादने भारतातील अनेक शहरांमध्ये आणि ऑनलाइन विकली जातात.
आर्थिक यश
कंपनीने 2022 मध्ये ₹11 कोटी आणि 2024 मध्ये ₹35 कोटींचा महसूल कमावला. पुढील पाच वर्षांत कंपनी ₹100 कोटींची कमाई करण्याचे आणि भारतातील टॉप आइस्क्रीम ब्रँड बनण्याचे ध्येय (Success Story) ठेवले आहे.
ऊंटाच्या दुधाचे महत्व (Camel Milk Benefits)
ऊंटाचे दूध आणि त्यापासून तयार उत्पादनांसाठी बाजारपेठेत वाढ होत आहे. कारण ऊंटाच्या दुधात अनेक चांगले गुणधर्म आहेत ज्यामुळे आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे.
- गाईच्या दुधाच्या तुलनेत ऊंटाच्या दुधात ‘व्हिटॅमिन सी’ चे प्रमाण जास्त असते.
- ऊंटाच्या दुधात जीवाणू आणि बुरशीसह विविध रोग जनकांच्या विरूद्ध प्रतिजैविक गुणधर्म आहेत.
- ऊंटाच्या दुधाच्या सेवनाने टाइप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये इंसुलिन संवेदनशीलता सुधारते असे आढळून आले आहे.
- संशोधन असे सूचित करते की ऊंटाच्या दुधाचा आतड्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांची लक्षणे कमी करण्यास मदत होऊ शकते.
- अभ्यासातून असे दिसून आले आहे की ऊंटाच्या दुधात संभाव्य कर्करोग विरोधी गुणधर्म असू शकतात.
भारतात स्टार्ट अपसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील तरुण उद्योजक ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हे त्यांच्यासाठी निर्मल चौधरी यांची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल (Success Story).