हॅलो कृषी ऑनलाईन : अधिक नफा कमवायचा झाला किंवा आर्थिक प्रगती करायची झाल्यास अनेक तरुण शहरांकडे धाव घेतात. मात्र आपण आपल्या गावात काही व्यवसाय सुरु करू शकता. त्यामुळे तुम्हाला गाव सोडून जाण्याची गरज नाही जिथे आहात तिथेच गावात राहून हे व्यवसाय करून देखील तुम्ही नफा मिळवू शकता अशा पाच व्यवसाय बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
माती परीक्षण व्यवसाय
केंद्र सरकारकडून माती परीक्षणासाठी सॉइल हेल्थ कार्ड योजना सुरू केली आहे. याद्वारे गावांमध्ये माती परीक्षण प्रयोगशाळा तुम्ही टाकु शकता. इथं शेतातील मातीचे परीक्षण करता येते. देशात ग्रामीण भागात माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा कमी प्रमाणात आहेत. माती परीक्षण करून शेतकऱ्यांना आवश्यक तो सल्ला देता येतो. केंद्र सरकारकडून एक सॉइल हेल्थ कार्ड जारी करण्यासाठी तीनशे रुपये अनुदान दिलं जातं.
दुग्ध व्यवसाय
गावात राहून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करता येण्यासारखा एक चांगला व्यवसाय आहे. यासाठी तुमच्याकडे चांगल्या गाई आणि म्हशी असणे आवश्यक आहे. दूध डेरीला किंवा थेट ग्राहकांना विकून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. शिवाय दुधापासून विविध पदार्थ देखील बनवून विक्री करू शकता.
बी-बियाणे दुकाने
शेतकऱ्यांना वर्षभर विविध कारणासाठी बी बियाणे आणि खते आवश्यक असतात. हा तसा जुना व्यवसाय आहे. पण गावांमध्ये नव्याने सुरू करता येऊ शकतो. गावात चांगल्या प्रकारे बी बियाणे विक्री दुकान चालवून कमाई करता येऊ शकते.
मेडिकल स्टोर
मेडिकल स्टोर हा असा व्यवसाय आहे जो आपण कुठेही सुरू करू शकता. यामध्ये फक्त चांगली कमाई होत नाही तर नियमित ग्राहक मिळतात फार्मसीचे शिक्षण घेतल्यानंतर मेडिकल स्टोअर देखील सुरू करता येतं याकरिता लायसन्स मिळवणं आवश्यक असतं.
दूध संकलन आणि विक्री
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करायचं ते शीतगृहात स्टोअर करायचं आणि मोठ्या दूध उत्पादक संघांना विकायचं याला बालक मिल्क कुलर देखील म्हटले जाते. याद्वारे एक प्लांट उभारता येईल त्याच्या मध्ये दूध खराब होण्यापासून वाचवता येते. त्यानंतर त्या शहरातील मोठ्या दूध डेरी ना विकता देखील येते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातून दूध खरेदी करावी लागेल आणि डेअरी कंपनी किंवा शहरात विक्री करावी लागेल बल्क कुलर प्लांटसाठी सरकार देखील मदत करते.