आता रेशनकार्ड मोबाईलमध्ये… घरबसल्या करा रेशन संबंधी सर्व कामे

ration card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार नवे ‘मेरा राशन ॲप’ हे ॲप लॉन्च केले आहे या ॲपच्या मदतीने धान्य घेताना मोठी मदत होणार आहे. हे ॲप कान्ज्युमर अफेअर्स मंत्रालयाने लॉन्च केले आहे. मंत्रालयांतर्गत धन्यवाटप प्रणालीवर या ॲपद्वारे काम केले जाते. रेशन धान्य वितरण पीडीएस च्या माध्यमातून हे काम केले जाते. त्यामुळे आता दुकानाच्या खेपा वाचणार आहे. धान्य मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे कन्जुमर अफेअर्स मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केले. काही लोक नोकरीनिमित्त राज्य बदलत असतात. प्रवासी मजूरही कामासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात. त्यामुळे स्थलांतरित व्यक्तींना धान्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेला सुरुवात केली आहे.

या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये रेशन कार्ड ची माहिती नोंदविण्यात आल्यानंतर ती माहिती तुम्ही डाऊनलोड करू शकता. रेशन कार्ड आधार लिंक आहे की नाही हेही पाहू शकता. रेशन कार्ड वर किती वितरण झाले आहे आणि तुमच्या घराजवळ किती रेशन कार्ड डीलर्स आहेत याचीही माहिती तुम्हाला मिळू शकते. ही पूर्ण सिस्टम गुगल मॅप ने जोडली गेली आहे.

मोबाईलमध्ये रेशनकार्ड घेण्याची प्रक्रिया

– सर्वात अधिक गुगल प्ले स्टोर वरून ‘मेरा राशन’ मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
– मोबाईल मध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय दिलेला असतो.
– जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करून रेशन धान्याचा फायदा घेऊ शकता.
– त्यासाठी तुम्ही रेशन कार्डचा नंबर टाकणं गरजेचं आहे.
– तसेच नंबर टाकल्यानंतर रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती दिसू शकेल.
– तुमचा आधार क्रमांक ही तिथे दिसेल.

याशिवाय तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत आहे की नाही याची माहिती घेता येऊ शकते. मोबाईल ॲप मध्ये एलिजिबिलिटी चा पर्याय दिला जातो पण आधार कार्डशी क्रमांक जोडला नसला तरीही अगदी सोप्या पद्धतीने जोडला जातो. तसाच तुम्ही नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समजेल की या योजनेअंतर्गत तुमचे राशन येते की नाही. आत मध्ये आधार सीडींग ची सुविधा दिली जाते. जर तुमचा आधार क्रमांक रेशन कार्ड लिंक नसेल तर तो तुम्ही सहजपणे इथे लिंक करू शकता.