अन बघता बघता 300 एकरावरील ऊस जळून खाक झाला ; सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान

burning sugercane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महापूर आणि अतिवृष्टी या संकटांनंतर बड्या मुश्किलीने वाढवलेल्या ऊसाला आग लागल्याची घटना घडली. दुधगाव येथील ऊसाला दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये सुमारे तीनशे एकरांवरील ऊस जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतू आगीचे लोट भयानक असल्याने अपयश आले. आगीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी अज्ञाताकडून आग लावण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत ऊस जळत असताना हतबल झाल्याचे दिसून आले. वारणा नदीकाठावर असलेल्या दुधगावमध्ये ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ऊसतोड हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबर आणि जानेवारीच्या प्रारंभीच झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊसतोडीवर परिणाम झाला होता. सध्या ऊसाचा हंगाम मध्यावधीत आला आहे. फेबु्रवारीच्या पंधरवड्यातही आडसाली लागणही शेतात उभी असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली असताना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास डिग्रज वाट, दुधगाव-कवठेपिरान रोडवरील ओढ्यापासून गणपती मंदीराजवळ कवठेपिरान हद्दीपर्यंतचा ऊसाला अचानक आग लागली.

बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले. अचानक ऊसातून धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, परंतू ऊस आणि ऊसाचे पाचत लवकर पेट घेत होते. आगीची दाहकता जादा असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही.