ढगाळ वातावरणामुळे कांदा, द्राक्ष, आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कांदा, द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी आता चांगलेच धास्तावले आहेत. परंतु रविवारी दुपारनंतर पुन्हा अचानक आभाळ भरून आल्याने नगर जिल्ह्यात नेवासा, सांगलीत नेरले साताऱ्यातील वाळवा नाशिक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जोरदार वारे वाहून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक,पुणे,सातारा, सांगली,कोल्हापूर भागात कोकणातील सिंधुदुर्ग मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे चांगलं नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले नसले तरी पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे.

दरम्यान रविवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते अधूनमधून काही प्रमाणात ऊन पडत असले तरी निवळण्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. परंतु दुपारनंतर पुन्हा अचानक ढग भरून आल्याने मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. गेले काही दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने चांगलेच दाणादाण उडवली आहे. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून वातावरण चांगलंच बदललं आहे.मराठवाड्यातही उन्ह आणि ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. मराठवाड्यातील सिल्लोड तालुक्यातील उपळी परिसरात हे वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला त्यामुळे द्राक्ष भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच भागात ढगाळ हवामानामुळे कलिंगड,खरबूज आणि भाजीपाला उत्पादक चिंतेत आहेत. नेवासा तालुक्यात ही काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे त्यामुळे कांदा द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी आता चांगलेच धास्तावले आहेत परंतु रविवारी दुपारनंतर पुन्हा अचानक धडक भरून आल्याने नगर जिल्ह्यात नेवासा, सांगलीत नेरले साताऱ्यातील वाळवा नाशिक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जोरदार वारे वाहून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात कोकणातील सिंधुदुर्ग मराठवाड्यातील औरंगाबाद बीड उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे त्यामुळे शेतातील पिकांचे चांगलं नुकसान झालंय नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले नसले तरी पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाला आहे.

दरम्यान रविवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते अधूनमधून काही प्रमाणात ऊन पडत असले तरी निवडण्या सारखी परिस्थिती तयार झाली होती परंतु दुपारनंतर पुन्हा अचानक ढग भरून आल्याने मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. गेले काही दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने चांगलेच दाणादाण उडवली आहे त्यानंतर मागील दोन दिवसांपासून वातावरण चांगलंच बदललं आहे.

मराठवाड्यातही उन्हाने ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहेत मराठवाड्यातील सिल्लोड तालुक्यातील उपळी परिसरात हे वादळी वारे वा मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला त्यामुळे द्राक्ष भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे पुण्या जिल्ह्यातील सर्वच भागात ढगाळ हवामानामुळे कलिंगड खरबूज आणि भाजीपाला उत्पादक चिंतेत आहेत. नेवासा तालुक्यात ही काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.