Onion Procurement: कांद्याला खुल्या बाजारपेठेत चांगला भाव; शेतकर्‍यांनी नाफेड, एनसीसीएफकडे फिरवली पाठ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नाफेड आणि एनसीसीएफच्या 5 लाख टन कांदा खरेदी (Onion Procurement) उद्दिष्टांपैकी फक्त 24 हजार टन कांदा खरेदी झाली असून खुल्या बाजारात चांगला भाव मिळत असल्याने नाफेडकडे शेतकर्‍यांनी (Farmers) पाठ फिरवली आहे. त्यामुळे नाफेड (NAFED), एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी (Onion Procurement) केंद्रांना लागणार टाळे लागणार की काय अशी परिस्थिती आहे.

राज्यातील ‘नाफेड’ अन् ‘एनसीसीएफ’च्या 155 कांदा खरेदी केंद्रांना मुदतीपूर्वीच टाळे लागणार असल्याची स्थिती आहे. सध्या या दोघा संस्थांच्या कांदा खरेदी केंद्रांवर (Onion Procurement Center) शुकशुकाट आहे. खासगी एजन्सीची वाढलेली मक्तेदारी, बाजारभावापेक्षा 500 रुपये कमी भाव; त्यातच यंदा प्रथमच सरकारकडून आठवड्याचे जाहीर होणारे भाव या कारणांमुळे शेतकर्‍यांनी सरकारी खरेदी केंद्रांवर पाठ फिरवली आहे.

नाफेड व एनसीसीएफचे (Nafed and NCCF) 90 टक्के कांदा खरेदी (Onion Procurement) केंद्र जिल्ह्यातच आहे. पाच टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट संस्थांनी निश्चित केले होते; परंतु दुर्दैव असे की, 10 जून अखेर केवळ 25 ते 30 हजार टन कांदा खरेदी झाला आहे. 

नाफेड अन् एनसीसीएफने कांदा खरेदी (Onion Procurement) करण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली. याला सुरुवातीपासून शेतकर्‍यांचा विरोध होता. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकर्‍यांचा आवाज सरकारच्या कानावर गेला नाही. 

त्यामुळे खासगी एजन्सी मार्फतच कांद्याची खरेदी नाफेड, एनसीसीएफच्या राज्यात सुरू झाली. मात्र दीड महिन्यात किमान 10 टक्के उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही. 

नाफेड अन् एनसीसीएफ या सरकारी संस्था पूर्णपणे खासगी एजन्सीच्या दबावात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून (Farmers Association) सातत्याने होत आहे. कोणत्या शेतकर्‍याकडून कांदा खरेदी करायचा याचा निर्णय संबंधित एजन्सीच घेत असल्याने सरकारी केंद्रांवर या एजन्सींची मक्तेदारी वाढली होती. त्यामुळे देखील शेतकर्‍यांमध्ये रोष होता.

मागील वर्षी जाहीर व्हायचा रोजचा भाव
मागील वर्षी नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांवर कांद्याचा भाव (Onion Procurement) रोजच जाहीर व्हायचा. या वर्षी मात्र आठवड्याचा भाव येऊ लागला. त्यामुळे व्यापार्‍यांशी स्पर्धा करण्यात ही केंद्रे अयशस्वी ठरली. भाव रोज होते तेव्हा शेतकर्‍यांना भावाबाबत उत्सुकता असायची. आठवड्याच्या भावामुळे मात्र शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडे वळला.

दर फक्त 2105 ‘नाफेड’कडून या आठवड्याचा कांद्याचा भाव फक्त 2105 रुपये आहे; तर खासगी व्यापार्‍याकडे मात्र 2650 ते 2700 चा भाव दोन दिवसांपासून आहे. हीच गत एनसीसीएफच्या भावाबाबतही आहे. त्यामुळेच या दोघा संस्थांच्या खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.