Pear farming : एक वेळ लागवड करून 50 वर्ष उत्पन्न देतं हे झाड, शेताच्या बांधावर लावून तुम्ही करू शकता लाखो रुपये; संपूर्ण माहिती वाचा

Pear farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pear farming : आपल्याकडे बरेचजण शेती हा व्यवसाय करतात. देशातील शेतकरी पारंपारिक पिकासोबतच विविध प्रकारची फळे पिकून आपले उत्पन्न वाढवत असल्याचे दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला नाशपातीच्या लागवडी बद्दल माहिती सांगणार आहोत. या शेतीमधून तुम्ही देखील चांगला नफा कमवू शकता. नाशपाती एक हंगामी फळ आणि त्याचे अनेक फायदे देखील आहेत. नाशपातीचे सेवन केल्याने शरीरातील रक्त परिसंचारण वाढते त्याचबरोबर खराब कोलेस्ट्रॉल ही कमी होते. नाशपातीचे अनेक शरीरासाठी फायदे असल्यामुळे लोक हे फळ आवडीने खातात. परिणामी लोकांनी या फळाला पसंती दिल्यामुळे बाजारात देखील या फळाला मोठी मागणी असते. प्रत्येक नाशपातीच्या झाडापासून शेतकरी एक ते दोन क्विंटल उत्पादन सहज मिळू शकतात. अशा प्रकारे जर एक एकरामध्ये 400 ते 700 क्विंटल नाशपातीची फळबाग लावता येते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

खात्रीशीर अन जातीवंत रोपे कशी विकत घ्यावीत?

शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा एखादं पीक घेतो तेव्हा त्यावर कित्तेक महिने मेहनत घेतो. पण ज्याचं पीक आपण लावलंय ते रोप चांगल्या क्वालिटीचं आहे का हे आपण अनेकदा पाहत नाही. बियाणे किंवा रोपं विकत घेताना आपण एक दोन रोपवाटिकांमध्येच चौकशी करतो. शेतातल्या कामातून आपल्याला अनेकदा त्यासाठी वेळहि मिळत नाही. पण जर तुम्हाला कमी किंमतीत खात्रीशीर अन जातिवंत रोपे विकत घ्यायची असतील तर Hello Krushi हे मोबाईल अँप बेस्ट आहे. कारण या अँपवर तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळील सर्व रोपवाटिकांसोबत संपर्क करण्याची सुविधा आहे. तुम्ही एका क्लिकवरून महाराष्टरातील कोणत्याही रोपवाटिका मालकाशी संपर्क करून सदर रोपवाटिकेत तुम्हाला हवी ती रोपे आहेत का हे चेक करू शकता. तसेच योग्य किमतीत रोप विकत घेऊ शकता. अनेक रोपवाटिका शेतकऱ्यांना फ्री होम डिलिव्हरीसुद्धा देतात. तेव्हा आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर ओपन करा आणि Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

नाशपातीच्या सुधारित जाती कोणत्या?

तुम्ही जर नाशपातीच्या लागवडीचा विचार करत असाल तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्या महत्त्वाच्या सुधारित जाती कोणत्या आहेत. याबद्दल माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. नाशपातीच्या विविध प्रकारच्या सुधारित जातींची भारतामध्ये लागवड केली जाते आणि त्यामधून उत्पादन देखील चांगले मिळते. नाशपातीच्या सुरुवातीच्या जातींमध्ये लिकसटन, सुपर थंबपिअर, सेनेस आणि अर्ली चायना या मुख्य जाती आहेत. त्याचबरोबर नाशपातीच्या उशिरा येणाऱ्या जातींमध्ये काश्मिरी नाशपती आणि डायने डिकोमीस इत्यादी प्रमुख आहेत.

नाशपातीची भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये लागवड केली जाते?

भारतातील अनेक राज्यांमध्ये नाशपातीची लागवड केली जाते. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश त्याचबरोबर हिमाचल प्रदेश या सर्वांचा समावेश आहे. नाशपातीच्या एकूण तीन हजार पेक्षा जास्त प्रजाती जगभरामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी भारतात 20 पेक्षा जास्त नाशपातीची लागवड केली जाते.

याच्या लागवडीसाठी हवामान कसे लागते?

कोणत्याही पिकाची जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्यासाठी हवामान पाहणे गरजेचे असते. आपण योग्य वेळी त्याची लागवड करणे देखील गरजेचे असते. तसेच नाशपातीची लागवड उष्ण आद्र उपोष्णकटिबंधीय मैदानापासून कोरड्या समशीतोष्ण भागांमध्ये केली जाते. यासाठी दहा ते पंचवीस अंशापर्यंतचे तापमान फळांच्या चांगल्या उत्पादनासाठी अनुकूल असते. जर तुम्ही हिवाळ्यात याच्या लागवडीचा विचार करत असाल तर हिवाळ्यामध्ये दव आणि धुक्यामुळे याच्या फुलांचे खूप मोठे नुकसान होत असते.

नाशपातीच्या लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

तुम्हाला जर नाशपातीची लागवड करायची असेल तर यासाठी तुम्हाला वालुकामय चिकन माती आणि खोल माती अशी असलेली जमीन या लागवडीसाठी चांगली मानली जाते. त्याचबरोबर शेतात पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था असावी नाशपातीच्या लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य ७ ते ८.५ दरम्यान असावे त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल.

नाशपातीच्या लागवडीमध्ये खत व्यवस्थापन कसे करावे

कोणती पिक घ्यायचे म्हणले तरी रासायनिक किंवा सेंद्रिय खताचा आपल्याला वापर करावा लागतो. तसेच नाशपातीच्या शेतीमध्ये फळाचे चांगले उत्पादन देण्याची घेण्यासाठी देखील काही खतांची आवश्यकता असते. नाशपातीच्या शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी गांडूळ खत किंवा शेणखत वापरावे जेणेकरून याचा तुम्हाला फायदा. होईल त्याचबरोबर नाशपातीचे झाड ज्यावेळी तीन वर्षाचे होईल त्यावेळी एका झाडाला दहा किलो 100 ते 300 ग्रॅम युरिया त्याचबरोबर दोनशे ते तीनशे ग्रॅम सिंगल फास्फेट आणि 24 ते 450 ग्रॅम मिळत ऑफ पोटॅश जमिनीत मिसळा आणि त्यानंतर झाडाला पाणी द्यावे असे केल्यानंतर तुम्हाला यामधून चांगले उत्पादन मिळेल

नाशपातीची कापणी

नाशपातीची फळे जून ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढली जात असून फळे पूर्ण पिकल्यानंतर याची कापणी करता येते. नाशपातीच्या फळांच्या काढण्याची वेळ विविधतेच्या आधारे ठरवली जाते. त्याची फळे पिकण्यासाठी जवळपास 145 दिवस लागतात तर सामान्य जातीसाठी 135 ते 140 दिवसात काढण्यासाठी तयार होतात.

नाशपातीमधून कमाई

नाशपातीला प्रति झाड सरासरी चार ते पाच क्विंटल फळे मिळतात अनेक जाती सहा ते सात क्विंटल उत्पादन देतात. एक एकरामध्ये 400 ते 700 क्विंटल नाशपातीची फळबाग लावता येते बाजारामध्ये 60 ते 100 रुपयापर्यंत नाशपातीचा भाव असल्याने शेतकरी बांधव यामधून लाख रुपये कमवू शकतात. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नाशपातीच्या लागवडीचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला एकदा कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.