Pearl Farming : कमीत कमी खर्चात सुरु करा मोत्याची शेती; महिन्याला होईल लाखात कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला तरुण शेतीकडे वळत विविध प्रयोग करत (Pearl Farming) आहेत. इतकेच नाही तर शेती क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये देखील ते आपले नशीब आजमावत आहेत. पोल्ट्री, ससे पालन, मत्स्यव्यवसाय, विविध सेंद्रिय खतांची निर्मिती हे सर्व व्यवसाय शेती करताना तुम्ही अगदी सहजपणे करू शकतात. परंतु तुम्हाला यातील काही व्यवसायांना त्या क्षेत्रातले थोडेसे प्रशिक्षण आणि नियोजन गरजेचे असते. ज्यामुळे कमीत कमी भांडवलात देखील असे व्यवसाय (Pearl Farming) सुरू करता येतात.

दहापट अधिक नफा (Pearl Farming Business Plan)

आज आपण या लेखात देखील अशाच शेतीशी संबंधित व्यवसायाची (Pearl Farming) माहिती घेणार आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून अगदी 25 ते 30 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून चांगला जम बसला तर महिन्याला लाखात कमावण्याची चांगली संधी आहे. सध्याच्या काळाचा विचार केला तर मोत्यांच्या लागवडीकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत असून, या मोत्यांची शेती अर्थात पर्ल फार्मिंगच्या माध्यमातून अनेक लोक खूप पैसा कमवत आहेत. असे म्हणतात की, गुंतवणुकीच्या तुलनेत यामध्ये दहापट अधिक नफा मिळवता येणे शक्य आहे.

कशी सुरु कराल पर्ल फार्मिंग?

तुम्हाला एका तलावाची गरज आहे. ज्या ठिकाणी मोती तयार करता येतो. त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगची गरज असून, प्रामुख्याने तीन गोष्टींवर यामध्ये लक्ष केंद्रित करायला लागते. तुम्ही यासाठी स्वखर्चाने तलाव खोदू शकतात किंवा सरकार 50 टक्के अनुदान देते त्याचा देखील लाभ घेऊ शकतात. ऑईस्टर अनेक राज्यांमध्ये आढळतात. परंतु दर्जाच्या बाबतीत विचार केला तर दक्षिण भारत आणि बिहारच्या दरभंगामध्ये ऑयस्टर चांगला मिळत असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी तुम्हाला थोडे ट्रेनिंग घ्यावे लागेल. मध्य प्रदेशमधील होशंगाबाद आणि महाराष्ट्रात मुंबई येथे मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते.

अशी करावी मोत्याची शेती

सर्वप्रथम ऑयस्टरला जाळ्यात बांधून दहा ते पंधरा दिवस तलावांमध्ये ठेवले जाते. जेणेकरून ते त्यांच्यानुसार त्यांचे वातावरण तयार करू शकतील. त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाते आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया म्हणजे ऑईस्टरच्या आत एक कण किंवा साचा घातला जातो. या साच्यावर कोटिंग केल्यावर ऑयस्टरचा थर तयार होतो. ज्याचे कालांतराने मोत्यात रूपांतर होते.

किती लागते भांडवल?

एक ऑयस्टर तयार करण्यासाठी 25 ते 35 हजार रुपये खर्च येतो. तर तयार झाल्यावर एका शिंपल्यातून दोन मोती निघतात. एक मोती किमान 120 रुपयांना विकला जातो. मोत्याचा दर्जा चांगला असेल तर दोनशे रुपयांपेक्षा जास्त दराने देखील विकला जातो. तुम्ही एक हजार ओयस्टर टाकले तर तुम्हाला दोन हजार मोती मिळतील. जरी यामध्ये सर्व शिंपले जगले नाहीत तर कमीत कमी 600 ते 700 ऑईस्टर जगतील. तुम्हाला बाराशे ते चौदाशे मोती मिळतील. हे मोती दोन-तीन लाख रुपयांना विकले जातील. यामध्ये हजार मोत्यांसाठी तुमचा खर्च 25 ते 35 हजार रुपये झाला आहे. यामध्ये तलाव खोदण्याचा खर्चाचा समावेश केला नसून, तो एकदाच होतो आणि त्यातही सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते.

error: Content is protected !!