सोयाबीन पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव; कसे वाचवाल पीक ?

Soybean
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास जून महिन्यात पाऊस झालाच नाही, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. ऑगस्ट महिन्यातही पहिल्या दोन आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक: सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर दहा पिवळे चिकट सापळे लावावेत.

सोयाबीन पिकावरील पाने खाणारी आळी : सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंटअळी, केसाळअळी, घाटेअळी) यांच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड 39.35% 3 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

सोयाबीन पिकावरील करपा : सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.