Pipeline Anudan Yojana: शेतकऱ्यांनो! फक्त 24 रुपये भरून मिळवा, ‘पाईपलाईन अनुदान योजनेचा’ लाभ..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी पाईपची (Pipeline Anudan Yojana) खरेदी करावी लागते. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च सुद्धा वाढतो. ही बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदी करण्यासाठी देखील अनुदान मिळत आहे. शेतकऱ्यांना पाईपलाईन (Pipeline Anudan Yojana) करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीव्हीसी पाईप साठी तसेच एचडीपीएसाठी अनुदान दिले जाते.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना (Farmers Scheme) राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी शासन या योजना राबवते. शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सिंचनासाठी (Agriculture Irrigation) देखील शासनाकडून वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान दिले जात आहे. शेतीमधून जर शाश्वत उत्पादन मिळवायचे असेल तर पाण्याची आवश्यकता असते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून पाईपलाईन अनुदान योजना (Pipeline Anudan Yojana) राबवली जात आहे. या योजनेत अंतर्गत किती अनुदान मिळते आणि यासाठी कुठे अर्ज करावा लागतो याबाबत थोडक्यात जाणून घेऊ या.

किती अनुदान मिळते?

शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप (PVC Pipe Subsidy Scheme) साठी 35 रुपये प्रति मीटर या प्रमाणे पाचशे मीटर पर्यंत अनुदान (Pipeline Anudan Yojana) मिळते. या अंतर्गत कमाल 15,000 रुपयाचे अनुदान दिले जाते. तसेच एचडीपी पाईप साठी पन्नास रुपये प्रति मीटर याप्रमाणे 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते. या अंतर्गतही कमाल 15,000 रुपयांचे अनुदान मिळते.

अनुदानासाठी अटी व नियम  

  • योजनेचा (Pipeline Anudan Yojana) लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावावरती सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
  • शेतकर्‍याच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असावा.
  • लाभार्थी शेतकरी जर दारिद्र्य रेषेखालील असेल, तरच त्याला पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • योजनेसाठी जे शेतकरी अर्ज करणार आहेत, त्यांच्याकडे एक हेक्टर किंवा कमीत कमी एक एकर जमीन असणे गरजेचे आहे.
  • या योजने अंतर्गत शासनाकडून पाईप खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाते, उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतःकडील भरावे लागेल.
  • पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेणार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. राज्याबाहेरील शेतकऱ्याला या पाईप लाईन अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्ज कुठे करावा लागतो?

पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत (Pipeline Anudan Yojana) कमाल 15,000 रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. अर्ज करतांना पाण्याच्या स्रोताची माहिती द्यावी लागते. महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर लॉटरी काढली जाते.

यात अर्ज केलेल्या शेतकऱ्याचे नाव आल्यास त्याला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जमिनीचा सातबारा, 8अ, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी आपण पाईप खरेदी करणार आहोत, त्या डीलरशिपचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात.

महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login हा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शुल्क म्हणून फक्त 23.60 रुपये भरावे लागतात. अर्थातच 24 रुपयात अर्ज केल्यानंतर पंधरा हजार रुपयांचे अनुदान पाईप खरेदीसाठी दिले जाते.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.