हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रोन चा उपयोग भारतामध्ये आता प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनचा वापर महत्वपूर्ण ठरतो आहे.
ड्रोन सेक्टर ची वाढती क्षमता पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक विशेष अभियानाच्या अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारताच्या विविध शहरांमध्ये आणि शेतांमध्ये कीटकनाशक फवारणी साठी वापरण्यात येणाऱ्या 100 ड्रोन्सच्या साठी हिरवा झेंडा दाखवला.यावेळी पीएम मोदी म्हणाले की, २१व्या शतकातील आधुनिक कृषी सुविधांच्या दिशेने हा नवा अध्याय आहे. मला खात्री आहे की हे प्रक्षेपण ड्रोन क्षेत्राच्या विकासासाठी केवळ मैलाचा दगड ठरणार नाही, तर अमर्याद शक्यतांचे आकाशही खुले करेल. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की ड्रोनच्या नावावर आधी असे वाटले होते की ही सैन्याशी संबंधित यंत्रणा आहे किंवा शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी वापरली जाणारी वस्तू आहे, परंतु आता त्याचा वापर शेती क्षेत्राला चालना देणारा ठरेल.
तरुणांसाठी रोजगाराच्या संधी
त्यांची संख्या लवकरच 200 च्या पुढे जाईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारतातील वाढत्या ड्रोन क्षमतेबाबत पीएम मोदी म्हणाले की, मला सांगण्यात आले आहे की गरुड एरोस्पेसने पुढील 2 वर्षांत 1 लाख मेड इन इंडिया ड्रोन बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे तरुणांसाठी नवीन रोजगार आणि नवीन संधी निर्माण होतील.