हॅलो कृषी ऑनलाईन: तूर, उडीद आणि मसूर डाळ यांचे संपूर्ण उत्पादन (Pulses Procurement Assurance) सरकार शेतकर्यांकडून खरेदी करेल, असे कृषिमंत्री (Agriculture Minister) शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले. ई-समृद्धी (E Samruddhi Portal) प्लॅटफॉर्मद्वारे, सरकार ही खरेदी करेल, असे ते म्हणाले. राज्यसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री यांनी हे (Pulses Procurement Assurance) आश्वासन दिलेले आहे.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकर्यांकडून एमएसपी (Crop MSP)अंतर्गत सर्वाधिक खरेदी केली आहे.
मागील यूपीए सरकारच्या आकडेवारीचा संदर्भ देत चौहान म्हणाले की 2003-2004 आणि 2013-14 दरम्यान, किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत केवळ 45 कोटी मेट्रिक टन खरेदी करण्यात आली.
सध्याच्या एनडीए सरकारने 2014-15 ते 2023-24 दरम्यान एकूण 69.18 कोटी मेट्रिक टन खरेदी (Pulses Procurement Assurance) केली आहे. विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि स्वामीनाथन समितीने शेतकर्यांना त्यांच्या खर्चावर 50 टक्के नफा देण्याची शिफारस केली होती, परंतु यूपीए सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.
सध्या बाजारात वेगवेगळ्या डाळींना चांगला भाव (Pulses Rate) मिळत आहे, परंतु शेतकर्यांजवळ विकायला डाळ उपलब्ध नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे नमूद केले आहे. डाळींचे उत्पादन, साठवण आणि विपणन (Pulses Procurement Assurance) मजबूत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी बजेटमध्ये सांगितले.
कृषिमंत्री यांनी डाळींची खरेदी करणार (Pulses Procurement Assurance) असल्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे भविष्यात डाळीला अच्चे दिन येतील असे समजायला हरकत नाही.
चहा आणि कॉफी उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी बघता त्यांना देखील एमएसपी अंतर्गत आणण्याची मागणी द्रमुकचे खासदार यांनी केली. यावर चौहान म्हणाले की 23 पिकांवर एमएसपी मंजूर केला जातो आणि चहा आणि कॉफी वाणिज्य आणि उद्योग मंत्री हाताळतात, जे त्यांचे सहकारी पीयूष गोयल हाताळतात.
डीएमके सदस्याने उपस्थित केलेल्या मुद्द्याचे कौतुक करताना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी म्हटले की एखाद्या सदस्याने चहा बोर्ड, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, अपेडा इत्यादी वर विचारले तर मी त्याचे स्वागत करीन आणि अर्ध्या तासाच्या चर्चेला परवानगी देईन,” धनकर म्हणाले की, गेल्या काही काळात चहामध्ये कोणतेही मूल्यवर्धन झाले नसल्याचे त्यांनी निरीक्षण केले आहे (Pulses Procurement Assurance) .