रब्बी पीक प्रात्यक्षिकाला सुरुवात ; महाडीबीटी प्रणालीद्वारे करा अर्ज, पहा काय आहेत नियम आणि दर

farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (अन्नधान्यपिके व गळीत धान्य ) याअंतर्गत यंदाच्या (2021- 22) रब्बी हंगामामध्ये राज्यात प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिक, सुधारित कृषी अवजार, सिंचन सुविधा, साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करावेत पीक प्रात्यक्षिक शेतकरी गटामार्फत राबवली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी संबंधित कृषी सहायकांशी संपर्क करून दहा हेक्‍टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक 30 ते 10 सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करावी. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे.

बियाण्यांचे दर

या अंतर्गत समाविष्ट जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी दहा वर्षांच्या आतील वाणास 25 रुपये प्रति किलो, दहा वर्षावरील वाणास 12 रुपये प्रति किलो, संकरित मका 95 रुपये प्रतिकिलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी दहा वर्षाच्या आतील वाणास 30 रुपये प्रति किलो, दहा वर्षावरील वाणास 15 रुपये प्रति किलो करडई बियाण्यासाठी 40 रुपये प्रति किलो, गहू पीक घेण्यासाठी दहा वर्षाच्या आतील वाणास 20 रुपये प्रति किलो, दहा वर्षावरील वाणास दहा रुपये प्रति किलोप्रमाणे बियाणं वितरण करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बाबी

— एकूण किमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टर मर्यादित लाभते आहे.
— पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादित बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्य, भूसुधारके व पिक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी संबंधित पिकाचा प्रकारानुसार दोन हजार रुपये ते चार हजार रुपये प्रतिएकर मर्यादित डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहेत.
— यासाठी कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणं अनिवार्य आहे.
–शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.
— शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीएस कच्छवे यांनी दिला आहे

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियानांतर्गत पीकनिहाय जिल्हे

गहू : सोलापूर बीड नागपूर
कडधान्य (हरभरा): राज्यातील सर्व जिल्हे
भरडधान्य मका : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सांगली, औरंगाबाद, जालना
पौष्टिक तृणधान्य : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
गळीत धान्य : सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली ,वाशीम आणि चंद्रपूर.