हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सध्या पावसाने (Rain Forecast Maharashtra) चांगला जोर धरला आहे. महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, पावसाने राज्याला झोडपून (Heavy Rainfall) काढलं आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) पावसाबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्यानुसार पुढील तीन ते चार तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, या काळात राज्याच्या विविध भागात मधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे (Rain Forecast Maharashtra).
मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस (Record Break Rainfall In Mumbai) झाला आहे, तब्बल 300 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तास मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, जोरदार पाऊस पडू शकतो असा इशारा (Rain Forecast Maharashtra) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये आज दुपार नंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा (Rain Forecast Maharashtra) देण्यात आला आहे.
दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून वादळाचं देखील मोठं संकट आहे, हवामान विभागानी दिलेल्या इशार्यानुसार या काळात वादळाचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मुंबई सोबतच मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे (Rain Forecast Maharashtra).
विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती
कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District Rainfall) रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा (Panchaganga) 30 फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. तब्बल 48 बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
राधानगरी धरण 42% भरले असून, त्यातून वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद 1250 तर वारणा धरणातून 675 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, आजूबाजूच्या शेतात घुसू लागले आहे.
कोदे धरण भरले
जिल्ह्यात आतापर्यंत चंदगड तालुक्यातील घटप्रभा, जांबरे धरणे भरली आहेत. रविवारी सकाळी गगनबावडा तालुक्यातील कोदे हा लघू पाटबंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यातून प्रतिसेकंद 400 घनफुटाचा विसर्ग सुरू आहे.
रविवारी सकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची पातळी 28 फुटांपर्यंत होती, दिवसभरात दोन फुटांची वाढ होत असतानाच तब्बल 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत (Rain Forecast Maharashtra).