हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील काही भागात माध्यम ते तुरळक स्वरूपात पाऊस पडत आहे . तर काही ठिकाणी ऊन पडले आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार हवामान तज्ज्ञ डॉ. के.एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी व बुधवारी कोकणांत काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे . राज्यात इतरत्र हलका ते माध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच त्याच्या पुढच्या २ दिवसात पावसाचे इशारे नाही अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
IMD, ने जारी केलेल्या इशाऱ्या प्रमाणे राज्यात मंगळवारी व बुधवारी कोकणांत काही भागात दर्शवला प्रमाणे पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे
राज्यात इतरत्र हलका ते माध्यम पावसाची शक्यता.
त्याच्या पुढच्या २ दिवसात पावसाचे इशारे नाही pic.twitter.com/cLTTo2TV2M— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2021
ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कसा असेल पाऊस ?
–मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य, सकारात्मक असेल. तसेच 95 ते १०५ टक्के पाऊस होईल अशी संभावना आहे.
— दुसऱ्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये सर्वत्र चांगला पाऊस होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण देशामध्ये काही भागांमध्ये सामान्य ते सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडण्याची संभावना आहे.
— ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस सामान्य राहील आणि त्यांची संभावना 94 ते 106 टक्के असेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
2 August 2021, डॉ महापात्र, डीजी आईएमडी ने मीडिया और अन्य हितधारकों को देश में अगस्त और सितंबर के लिए मॉनसून सीजन के दूसरे भाग में होने की संभावना के बारे में जानकारी दी. pic.twitter.com/EVAgOBukoj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2021