Remal Cyclone: रेमल चक्रीवादळ धडकणार ‘या’ ठिकाणी! तीव्र वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले रेमल चक्रीवादळ (Remal Cyclone) आज रविवारी (26 मे) पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर (Coast of West Bengal) धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) या चक्रीवादळासाठी रेड अलर्ट जारी केला असून, ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे आणि 1.5 मीटर उंचीपर्यंत लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे (Weather Update).

आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की चक्रीवादळ (Remal Cyclone) आणखी जोरात राहील, त्यामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळाचा धोका निर्माण होईल. चक्रीवादळाचा सध्याचा इशारा 28 मे पर्यंत लागू आहे; तथापि, आवश्यक असल्यास ते वाढविले जाऊ शकते, IMD ने सांगितले.

आसाम (Assam) आणि मेघालयातही (Meghalaya) अतिवृष्टी आणि इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्ये, जसे की मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश येथे  27 आणि 28 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 राज्य प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना

  • चक्रीवादळाच्या (Remal Cyclone) तीव्रतेमुळे कोलकाता विमानतळ आज दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
  • मच्छिमारांना बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
  • कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
  • हवामान खात्याने आपल्या बुलेटिनमध्ये लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे आणि चेतावणीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे

रेमल चक्रीवादळ माहिती

‘रेमाल’ चक्रीवादळ (Remal Cyclone) हे मॉन्सूनपूर्व हंगामातील बंगालच्या उपसागरातील पहिले चक्रीवादळ आहे. हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नाव देण्याच्या प्रणालीनुसार, ‘रेमल’ म्हणजे अरबी भाषेत ‘वाळू’.

रेमाल चक्रीवादळाची (Remal Cyclone) निर्मिती नैऋत्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या प्रणालीद्वारे सुरू झाली.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.