हॅलो कृषी ऑनलाईन: कोकणात (Rice Crop Management) परतीच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील (Konkan Region) काही भागात सध्या खरीप भात (Kharif Paddy) पिकात फुटवे अवस्था असून, काही ठिकाणी भात पिकाची पुनर्लागवड, आंतरमशागतीची कामे, तर काही ठिकाणी अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि कीड व रोग नियंत्रणाची कामे जोरात सुरु आहेत. सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या अवस्थेतील भात पिकाचे व्यवस्थापन (Rice Crop Management) कसे करावे याविषयी जाणून घेऊ या.
खरीप भात पिकाचे व्यवस्थापन (Rice Crop Management)
- नदीकाठच्या भागात भातशेतीत नव्याने लावलेली भाताची रोपे सतत पाणी साचल्याने कुजली आहेत. सदर ठिकाणी लावणीसाठी (Rice Transplanting) भाताच्या लवकर वाणांची रोपे उपलब्ध नसल्यास. अशा वेळी भातशेतीतील 80% पेक्षा जास्त भाताची रोपे कुजली असल्यास, भात शेतीतील पाण्याचा निचरा करावा.
- वाफसा स्थितीत चिखलणी करून हळव्या जातीचे भात बियाणे रहु (अंकुर) काढून पेरले पाहिजे. तसेच,
- ज्या भागात भातशेतीमध्ये (Rice Crop Management) भाताची रोपे कमी कुजलेली (Rotting Of Paddy Seedlings) आहेत, तेथे पुनर्लागवडीनंतर (30 ते 40 दिवसांनी फुटवे अवस्थेत देण्यात येणाऱ्या नत्राची मात्रा 20 टक्क्यांनी वाढवून द्यावी.
- येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन आजूबाजूच्या पावसाची परिस्थिती आणि पावसाचा अंदाज पाहून भात पुनर्लागवडीची कामे हाती घ्यावे.
- चिखलणीच्या (Rice Puddling) वेळेस 35 किलो युरिया, 125 किलो. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 34 कि.ग्रॅ. म्युरिएट ऑफ पोटॅश खत प्रति एकर मिसळावे. प्रति एकर 2 टन गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस घातल्यास 50% नत्र खताची मात्रा कमी द्यावी लागते.
- 20 ते 21 दिवसांनी 12 ते 15 सेमी उंच आणि 5 ते 6 पाने फुटलेल्या रोपांची पुनर्लागवड करावी.
- हळव्या जातींसाठी भाताची लागवड 15 x 15 सेमी अंतरावर करावी. लावणी सरळ आणि उथळ 2.5 ते 3.5 सेमी खोल असावी (Rice Planting Spacing). उथळ लागवड केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडामध्ये 2 ते 3 रोपे लावावीत, संकरित भातासाठी एका एका ठिकाणी फक्त एक रोपे लावावे.
- लावणीनंतर (Rice Crop Management) पहिले 30 दिवस भात शेतीतील पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेमी ठेवावी जेणेकरून तणांचा प्रादुर्भाव कमी होईल आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा (Draining Of Excess Water).
- ढगाळ हवामान आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे बुरशीजन्य करपा (Rice Anthracnose Disease), रोपांच्या पानांवर जांभळे ठिपके दिसून येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल (75% पाण्यात विरघळणारे पावडर) 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात किंवा आयसोप्रोथिओलीन 40% ईसी 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाचे प्रमाण कमी असताना व उघडीप मिळाल्यावर फवारावे.
- उघडझाप पावसामुळे भात रोपवाटिकेमध्ये लष्करी अळीचा (Rice Army Worm) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कीड व्यवस्थापनासाठी शेतातील बांध तणमुक्त ठेवावे, भात रोपवाटिकेत पक्षी थांबे उभे करावेत. जास्त समस्या उद्भवल्यास आणि गरजेनुसार, क्लोरोपायरीफॉस 1.5% पावडर संध्याकाळी किंवा पहाटे वारा शांत असताना आणि पाऊस नसताना किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% EC 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे (Rice Crop Management).