Saffron Price Hikes : भारतीय केशरला सोन्याचा भाव! 1 किलोसाठी मोजावे लागताय 4.95 लाख रुपये!

Saffron Price Hikes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील केशर उत्पादकांना (Saffron Price Hikes) सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही काळापासून अनेक जण राज्यात बंदिस्त वातावरणात केशर लागवड करताना आढळून आले आहे. विशेष म्हणजे त्यांना गुणवत्तापूर्ण केसर उत्पादन मिळवण्यात यश देखील आहे. अशातच आता भारतीय केशरच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या 1 किलो भारतीय केशरसाठी तब्बल 4.95 लाख रुपये मोजावे लागत आहेत. हे दर गेल्या काही महिन्यातच 20 ते 27 टक्क्यांनी वाढले (Saffron Price Hikes) आहेत. त्यामुळे नव्याने केशर उत्पादन मिळवत असलेल्या उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे.

इराणमधील पुरवठा झाला कमी (Saffron Price Hikes)

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे इराणमधून केशरच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. इराण हा जगातील सर्वात मोठे केशर उत्पादक देश आहे आणि तेथील उत्पादनात घट झाल्याने जागतिक बाजारपेठेत केशरची टंचाई निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देश इराण मधूनच केशर आयात करतात. त्यामुळे पुरवठा कमी झाल्याने, भारतातील केशरला मागणी वाढली असून, परिणामी केसरच्या किंमतीत देखील मोठी वाढ (Saffron Price Hikes) झाली आहे.

भारतातील उत्पादनात घट

इराणमधील पुरवठ्यात घट झाल्याशिवाय भारतातील केशर उत्पादनातही यंदा घट झाली आहे. जम्मू-काश्मीर हे भारतातील सर्वात मोठे केशर उत्पादक राज्य आहे. मात्र, यावर्षी या राज्यात हवामानातील बदलांमुळे केशर उत्पादनात घट झाली आहे. भारतीय केशरला जगभरात मागणी आहे. सध्या सण आणि उत्सव जवळ येत आहेत. आणि या काळात केशरची खरेदी वाढते. त्यामुळे मागणी वाढल्याने आणि पुरवठा कमी झाल्याने केशरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

काश्मीरी केशरला सर्वाधिक मागणी

भारतात अनेक ठिकाणी केशरचे उत्पादन होते. मात्र, काश्मीर केशराला सर्वाधिक मागणी आहे. काश्मीर केशरचा दर्जा उत्तम मानला जातो आणि त्याची चव आणि सुगंधही अप्रतिम असतो. त्यामुळे काश्मीर केशरची किंमत इतर केशरच्या तुलनेत जास्त असते. भारत यूएई, यूएसए, ऑस्ट्रेलिया, नेपाळ आणि कॅनडा या देशांना केशरचा पुरवठा करतो. केशरचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. मिठाई, पदार्थ, चहा आणि कॉफीमध्ये केशर टाकून त्याची चव आणि सुगंध वाढवला जातो. तसेच केशर औषधी गुणधर्मांसाठीही प्रसिद्ध आहे.