हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची विक्री वाढण्याचा अंदाज ; कधी वाढतील खुल्या बाजारातील दर? जाणून घ्या

hrbhra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये करण्यात आला आहे. सध्याचे भाव बघता हरभऱ्याचे बाजार भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत. त्या तुलनेत नाफेड वर हरभऱ्याला चांगली किंमत मिळत आहे. यावर्षी विक्रमी हरभऱ्याचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र जाणकारांच्या मते देशात 85 ते 95 लाख इतरांच्या दरम्यान उत्पन्न होईल असा अंदाज आहे. शिवाय कोरोनाचे वातावरण निवळल्यामुळे हॉटेल्स,रेस्टोरंट कडूनही मागणी वाढण्याची शक्यता आहे.

खुल्या बाजारात कधी वाढणार हरभऱ्याचा दर ?
सध्याचे वातावरण पाहता आयात, नाफेडची विक्री आणि नवीन मालाची आवक या तीन गोष्टींमुळे बाजारात हरभरा दर हा पाच हजारांच्या आतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला हमीभावाने हरभरा विकावा तसेच खुल्या बाजारातील दर तीन महिन्यांनंतर हमीभाव एवढे राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

नाफेडकडून खरेदी वाढण्याची शक्यता
तज्ञांच्या मते नाफेड कडून हरभऱ्याची 15 लाख टन इतकी खरेदी केली जाईल. यापैकी महाराष्ट्रात सहा लाख 80 हजार टनांची खरेदी होण्याचा अंदाज आहे. त्यातच नाफेड कडे केवळ 17 लाख टनांचा साठा असल्याचं तज्ञ व्यक्तींनी सांगितले आहे. तर नाफेड 21 लाख टन कडधान्य असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रब्बित नाफेडची खरेदी वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. देशात आतापर्यंत हमीभावाने 210000 हरभरा खरेदी झाला. हमीभावाने खरेदीत गुजरात आघाडीवर आहे. गुजरात मध्ये आतापर्यंत 1 लाख 10 हजार तर खरेदी झाली आहे. तर महाराष्ट्रात 86 हजार क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडून खरेदी झाला आहे. तसेच कर्नाटक राज्याचा विचार करता कर्नाटकातील खरेदी वीस हजार टनांवर पोहोचली. सध्या बाजारात दर कमी असल्याने यंदा नाफेडची हरभरा खरेदी वेगानं सुरू आहे.

राज्यात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले…
यंदाच्या रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड राज्यामध्ये झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात ही लागवड नऊ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यामध्ये 27 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा डोलतोय. क्षेत्राचा विचार केला तर गुजरातमध्ये सर्वाधिक 34 टक्‍क्‍यांनी हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. इथं हरभरा क्षेत्र आठ लाख हेक्टर वरून थेट 11 लाख हेक्‍टरवर पोहोचला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये 25 लाख हेक्‍टरवर लागवड केली आहे. राजस्थानचा विचार करता राजस्थान मध्ये 20 लाख हेक्टर आणि कर्नाटकात अकरा लाख हेक्‍टरवर हे पीक घेतले जातात त्यामुळे एकूणच राज्यांमध्ये हरभऱ्याचा मोठा पेरा झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी मात्र थोडा संयम ठेवून हमीभाव केंद्रावर विक्री करावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.