Satbara Notification: ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’, तुमच्या मालकीच्या जमिनीवरील घडामोडीची तुम्हाला त्वरित देईल माहिती!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना जमिनीच्या (Satbara Notification) मालकी हक्कासंबंधी बदलांची त्वरित माहिती देण्यासाठी ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ (Notification Updation Portal) नावाची नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेद्वारे, तुमच्या जमिनीच्या सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचा बदल (Satbara Notification) होत असल्यास त्याची माहिती तुम्हाला त्वरित मिळेल.

या सुविधेसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क भरावे लागेल. या पोर्टलवर नोंदणी (Portal Registration) केल्यानंतर, जमिनीच्या मोजणीमध्ये बदल, फेरफार नोंदी, किंवा इतर कोणत्याही प्रकारे मालकी हक्कात बदल झाल्यास तुम्हाला एसएमएस आणि ई-मेलद्वारे त्वरित सूचना मिळेल (Satbara Notification).

नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलचे’ फायदे (Notification Updation Portal Benefits)

  • जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी बदलांची त्वरित माहिती मिळेल.
  • भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर वारंवार जाऊन तपासणी करण्याची गरज नाही.
  • जमिनीवर कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होत आहे का याची माहिती मिळेल.

नोंदणी कशी करायची?

  • भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ साठी नोंदणी करा.
  • आवश्यक माहिती द्या आणि नाममात्र शुल्क भरा.
  • तुमच्या जमिनीच्या सातबारा अथवा मिळकत पत्रिकेचा क्रमांक द्या.
  • तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी द्या.

केव्हा उपलब्ध होणार सुविधा

भूमी अभिलेख विभागाने या सुविधेसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. राज्य सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर आणि नाममात्र शुल्क निश्चित झाल्यानंतर, पोर्टल विकसित करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल.

भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या सुविधेद्वारे जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी बदलांची माहिती त्वरित मिळाल्यास, नागरिकांना त्यांच्या जमिनीवर होणाऱ्या कोणत्याही गैरव्यवहारापासून बचाव करता येईल (Satbara Notification).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.