Seed Production: खरीप हंगामासाठी महाबीज द्वारे 5 हजार 470 हेक्टरवर ‘बिजोत्पादन’ कार्यक्रम प्रस्तावित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आगामी खरीप हंगामासाठी बिजोत्पादन (Seed Production)  कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ अर्थातच ‘महाबीज’ (Mahabeej) ने कंबर कसली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात (Kharif Season) ‘महाबीज’ ने 5 हजार 470 हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित केला आहे. या हंगामासाठी शेतकर्‍यांना पायाभूत आणि प्रमाणित बियाणे पुरवठ्याची (Seed Production) पूर्ण तयारीही ‘महाबीज’ ने केली आहे.

वाशिम जिल्ह्यात दरवर्षी महाबीज कडून खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्युट आदी बियाण्यांच्या उत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यात येतो. यंदाही ‘महाबीज’ ने खरीपाची पूर्ण तयारी केली आहे. या हंगामात 69 हजार 273 क्विंटल बियाणे उत्पादनाचे (Seed Production) उद्दिष्ट असल्याची माहिती महाबीजकडून देण्यात आलेली आहे.  

या हंगामातही जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्यूट या पिकांच्या वेगवेगळ्या वाणांचा प्रमाणित व पायाभूत बियाणे उत्पादनाचा (Seed Production Program) कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रस्तावित बीजोत्पादन कार्यक्रमामध्येही सर्वाधिक प्रमाण सोयाबीन (Soybean Seed Production) या पिकाचे बीजोत्पादनाचे क्षेत्र आहे.

बीजोत्पादनात वेगवेगळ्या पिकांचे समाविष्ट वाण

यंदाच्या हंगामात महाबीजने खालील प्रमाणे वेगवेगळ्या पिकांच्या वाणांचा (Crop Variety) समावेश केलेला आहे.

सोयाबीन – जेएस 20- 116, जेएस- 335, जेएस 9305, केडीएस 753, एमएसीएस- 1281, 1460, एमएयूएस- 158, 162, 71, 725, पीडीकेव्ही अंबा, फुले दुर्वा, फुले संगम, सुवर्ण सोया

मूग – बीएम 2003-2, फुले चेतक, उत्कर्षा

तुरी – बीडीएन-716, आयसीपी 8863

उडीद – एकेयू 10-1, टीएयू-1

ज्युट – जेआरओ- 524

तालुकास्तरावरील क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी सुरू

यंदाच्या खरीप हंगामातील बिजोत्पादन (Seed Production) कार्यक्रमासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सहा  तालुक्यातील महाबीजच्या क्षेत्र अधिकारी कार्यालयात शेतकर्‍यांची अग्रीम आरक्षण नोंदणी सुरू करण्यात आली. महाबीजच्या बिजोत्पादन कार्यक्रमात अधिकाधिक शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.

5,388 हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादन (Soybean Seed Production)

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून सर्व बियाणे मिळून 5 हजार 4870 हेक्टरवर बिजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित केला आहे. त्यात सोयाबीनचे क्षेत्र 5 हजार 388 हेक्टर राहणार असून, यात प्रमाणित दर्जाच्या सोयाबीन बिजोत्पादनाचे क्षेत्र 4 हजार 47 हेक्टर, तर पायाभूत सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमाचे क्षेत्र 1 हजार 341 हेक्टर आहे.

कोणत्या बियाण्यांचे किती हेक्टर बीजोत्पादन (Seed Production)?

• सोयाबीन (प्रमाणित दर्जा) – 4047

• सोयाबीन (पायाभूत) – 1341

• मूग (प्रमाणित दर्जा) – 15

• तूर (प्रमाणित दर्जा) – 34

• उडीद (प्रमाणित दर्जा) – 13 • ज्युट (प्रमाणित दर्जा) – 20