Gram Variety : हरभरा लागवडीसाठी करा ‘या’ सुधारीत वाणांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : हरभरा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य वाणांची (Gram Variety) निवड करणे महत्त्वाचे आहे. हे पीक प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते. सोयाबीनची कापणी केल्यानंतर बरेचसे शेतकरी हरभरा लागवडीसाठी सुधारीत वाणांची निवड पिकाची लागवड करतात. हरभरा पिकासाठी जमिनीची निवड महत्त्वाची आहे. हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी व निचरा होणारी जमीन असावी. सिंचनाची व्यवस्था असल्यास मध्यम प्रकारच्या जमिनीतही हरभरा पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते.

लागवड कधी करावी?

20 ऑक्टोबरनंतर पावसाचे प्रमाण कमी झालेले असते आणि थंडीला सुरुवात झालेली असते, वातावरणात तापमानही जास्त असते अशात वातावरणात हरभऱ्याची पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होते. असे हवामान हरभरा पिकाच्या लागवडीसाठी योग्य असते. मात्र योग्य वाणांची (Gram Variety) निवड करणे महत्त्वाचे असते.

वाणांची निवड (Gram Variety)

सुधारीत वाण (Gram Variety)
विजय : अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. तसेच हा वाण अवर्षण प्रतिकारक्षम आहे. या वाणाचा कालावधी जिरायतीसाठी 85 ते 90 तर बागायतीसाठी 105 ते 110 दिवस इतका आहे. या वाणापासून क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
विशाल : 110 ते 115 दिवसात येणारा हरभऱ्याचा वाण असून जिरायतीसाठी 13 क्विं./हे. तर बागायतीसाठी 20 क्विं./हे. उत्पादन मिळते. हा वाण मर रोगास प्रतिकारक्षम आहे.
विराट : हा काबुली वाण आहे. हा वाण मर रोगास प्रतिकारक्षम असून याचे दाणे टपोरे आहेत. या वाणापासून जिरायतीमध्ये 11 क्वि./हे. तर बागायतीमध्ये 19 क्विं./हे. उत्पादन मिळते.
दिग्विजय : हा वाण जिरायतीसाठी 90 ते 95 तर बागायतीमध्ये 105 ते 110 दिवसांत तयार होतो. जिरायतीमध्ये 14 क्विं./हे. तर बागायतीमध्ये 23 क्विं./हे. उत्पादन मिळते. हा वाण जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य असून मररोग प्रतिकारक आहे.
कृपा : हा 105 ते 110 दिवसात येणारा वाण आहे. या वाणापासून सरासरी 18 क्विं./हे. उत्पादन मिळते. जास्त टपोरे व पांढऱ्या रंगाचे दाणे असणारा हा वाण आहे.
फुले विक्रम : या वाणापासून जिरायतीमध्ये 16 क्वि./हे. तर बागायतीमध्ये 22 क्विं./हे. इतके सरासरी उत्पादन मिळते. या वाणाचा वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने (कंबाईन हार्वेस्टरने) काढणी करण्यास उपयुक्त आहे. या वाणाची उत्पादनक्षमता अधिक असून मर रोग प्रतिकारक आहे. फुले विक्रम हा वाण जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.