हॅलो कृषी ऑनलाईन: सप्टेंबर महिन्यात (September Monsoon Forecast) सरासरीच्या 109 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. जुलै ऑगस्ट नंतर आता सप्टेंबरमध्ये सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज भारतात सलग तीन महिने अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप पिकांच्या ऐन कापणीच्या (Kharif Crop Harvesting) टप्प्यावर असलेल्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा (September Monsoon Forecast) व्यक्त केलेली आहे. 167.9 मिमीच्या दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (LPA) 109 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार असे त्यांनी सांगीतले आहे.
उत्तर-पश्चिम प्रदेशातील काही भाग, दक्षिण द्वीपकल्पीय भारताचे बरेच भाग, उत्तर बिहार आणि उत्तर-पूर्व उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील बहुतेक भाग वगळता, भारताच्या बहुतेक भागात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD च्या अंदाजानुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील उत्तर-पश्चिम भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे (September Monsoon Forecast). या भागात अत्यंत मुसळधार पावसामुळे पूर येऊ शकतो. भूस्खलन, चिखल आणि भूस्खलनापासून नागरिकांनी सावध राहिले असा इशाराही मोहापात्रा यांनी दिला.
महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाची प्रणाली विकसित होण्याची शक्यता असते, ज्यामुळे देशभरात लक्षणीय पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात अनेक कमी-दाब प्रणाली विकसित होण्याच्या शक्यतेसह मॉन्सूनचा प्रवाह त्याच्या सामान्य स्थितीत राहण्याची शक्यता आहे, जी पश्चिम-वायव्य दिशेने राजस्थानपर्यंत जाऊ शकते.
ऑगस्ट महिन्यात देशात 287.1 मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्य 248.1 मिमीपेक्षा 15.7 टक्के जास्त आहे. जूनमध्ये 11 टक्के कमी आणि जुलैमध्ये 9 टक्के अतिरिक्त पाऊस झाला.
23 ऑगस्ट पर्यंत खरीप पेरणी हंगामाच्या 1.096 लाख हेक्टरच्या सामान्य क्षेत्राच्या जवळपास पोहोचली आहे आणि कापूस आणि ताग वगळता, इतर बहुतेक पिकांचे एकरी क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. शेतकर्यांनी यावेळी सामान्य आणि काही ठिकाणी लवकर पेरणी केली ज्यामुळे कापणीचा सामान्य कालावधी येत आहे.
भात, तूर आणि भुईमुग यांसारख्या पिकांवर परिणाम होणार नसला तरी, बाजरी, सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांना धोका असू शकतो (Kharif Crops At Risk) कारण सप्टेंबरमध्ये एकूण मॉन्सूनच्या (September Monsoon Forecast) 19 टक्के पाऊस पडू शकतो. जूनच्या शेवटच्या आठवड्यात 75 दिवसांची परिपक्वता असलेली पिके सप्टेंबरमध्ये काढणीसाठी तयार होऊ शकतात आणि मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) सुरू राहिल्यास ती पिके धोक्यात येऊ शकतात.