Shakira Cow : ‘या’ शेतकऱ्याची गाय देते 80 लिटर दूध; आशियात सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम!

Shakira Cow Gives 80 Liters Of Milk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादकांना एखादी गाय (Shakira Cow) ही दिवसाला 80 लिटर दूध देते, असे सांगितले तर खरे वाटेल काय? मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याच्या गायीबद्दल सांगणार आहोत. जिची दिवसातून तीन वेळा धार काढावी लागते. असे 24 तासांमध्ये तीन वेळेचे मिळून ही गाय तब्बल 80 लीटर 756 मिलीग्रॅम दूध देते. हरियाणामध्ये एका पशु मेळाव्याचे आयोजन कऱण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये शेतकरी सुनील आणि शैंकी या दोन भावंडांनी आपली शकिरा ही गाय (Shakira Cow) प्रदर्शनात ठेवली होती. या प्रदर्शनात या गायीने 80 लीटर 756 मिलीग्रॅम दूध देण्याचा विक्रम आपले नावे केला आहे.

दरम्यान, यापूर्वी आशिया खंडात सर्वाधिक 72 लीटर दूध देणाऱ्या एका गायीचा विक्रम होता. शकिरा या हरियाणातील गाईने (Shakira Cow) हा विक्रम आपल्या नावे केला असून, या मेळाव्यामध्ये सर्वाधिक दूध देणाऱ्या गायीच्या पुरस्काराने तिला सन्मानित देखील करण्यात आले आहे. शेतकरी सुनील आणि शैंकी हे हरियाणातील झंझाड़ी या गावचे रहिवासी आहेत. मागील 12 वर्षांपासून हे दोघे भावंडे दुग्धव्यवसाय चालवत आहेत. त्यांच्याकडे सध्या शंभरहून अधिक जनावरे व गायी आहेत. पशुपालन हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून, पशुपालनासोबतच ते आपली शेतीही करतात. त्यांनी आपल्या पशुपालन व्यायवसायाचा मोठा विस्तार केला असून, अनेक मोठे शेड उभारले आहेत.

शकिरा गायीची वैशिष्ट्ये (Shakira Cow Gives 80 Liters Of Milk)

24 तासांमध्ये तीन वेळेचे मिळून 80 लीटर दूध देणारी शकिरा गाय ही 6 वर्षांची आहे. ती होलस्टीन फ्रिजियन या जातीची आहे. शेतकरी सुनील सांगतात, या जातीच्या गायीची तुम्ही जितकी काळजी घ्याल. तितक्या त्या अधिक दूध देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय करताना जनावरांच्या आहारासह स्वच्छतेवर अधिक भर देणे गरजेचे असते. आपण शकीराला नियमित हिरवा चारा, सुखा चारा आणि सोबतच पशु खाद्य देखील देतो. इतर शेतकरी याच पद्धतीने जातात, मात्र गोठ्याच्या स्वच्छतेसह जनावराच्या पाण्याच्या वेळा, चाऱ्याची वेळ सांभाळावी लागते. असे ते सांगतात.

तीन वेळा काढतात धार

शेतकरी सुनील हे आपल्या सर्व गायींची आठ तासांच्या अंतराने तीन वेळा धार काढतात. यासाठी त्यांनी मिल्किंग मशिन्स खरेदी केलेल्या आहेत. तसेच त्यांनी आपले उभारलेले सर्व शेड हे हव्या खेळती राहील, अशा पद्धतीने उभारलेले आहेत. याशिवाय सर्व जनावरांना ते स्वच्छ पाणी देण्याबाबत काळजी घेतात. दरम्यान, स्पर्धेच्या काही दिवस आधीच्या काळात आपण शकिराला मोकळ्या वातावरणात बांधतो. त्यामुळे तिच्या दुधात वाढ होते. असेही ते सांगतात.