हॅलो कृषी ऑनलाईन: ज्या भागात सोयाबीनची (Soybean Pest Control) पेरणी जून महिन्यात झाली तेथे सोयाबीन पीक (Soybean Crop) रोप अवस्थेत असून दोन ते तीन आठवड्यांचे झालेले आहे. कोरड्या वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोड माशी (Soybean Stem Fly) व पाने गुंडाळणारी अळी (Soybean Leaf Folder) या किडींचा (Soybean Pest Control) प्रादुर्भाव दिसून येत आहे.
प्रादुर्भावाच्या प्राथमिक अवस्थेत या किडींचे व्यवस्थापन (Soybean Pest) करणे हे सुदृढ पीक वाढीसाठी व त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असते. या किडींचे शास्त्रोक्त पद्धतीने नियंत्रण (Soybean Pest Control) व व्यवस्थापन करण्याविषयी माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.
सोयाबीन पिकावरील किडीचे नियंत्रण उपाय (Soybean Pest Control)
खोडमाशी: उगवणीपासून 7 ते 10 दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येतो, त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात. झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून त्यावर लालसर काळे ठिपके दिसू लागतात, तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुरडला जातो व रोपे वाळून मरून जातात. परिणामी शेतातील रोपांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते.
पिकाच्या वाढीच्या नंतरच्या अवस्थेमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत परंतू, खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.
खोडमाशी नियंत्रण/व्यवस्थापन (Soybean Pest Control)
- 10 ते 15% प्रादुर्भावग्रस्त झाडे, या आर्थिक नुकसान पातळीवर नियंत्रणात्मक उपाययोजना करावी.
- सोयाबीनची पेरणी वेळेवर म्हणजे जून महिन्यात योग्य वाफस्यावर केल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो.
- किडीस प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.
- पेरणीच्या वेळी थायमेथोक्झाम (30 FS) 10 मिलिची प्रति एक किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.
- पीक 7-10 दिवसांचे असताना किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच थायमेथोक्झाम 25% WG 75 ग्रॅम प्रति हेक्टर किंवा थायमेथोक्झाम 12.60% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन 9.50% झेड.सी. 125 मिलि प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे.
पाने गुंडाळणारी अळी: या किडीच्या अळ्या सुरवातीला पाने पोखरून त्यावर उपजीविका करतात, नंतर ही कीड एक किंवा अधिक पाने एकमेकांस जोडून पानाच्या सुरळीत राहून त्यातील हरितद्रव्यावर जगते. प्रादुर्भावीत झालेली काही पाने गळून पडतात.
पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण/व्यवस्थापन (Soybean Pest Control)
- किडीच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या कालावधीत गुंडाळलेली किंवा सुरळी झालेली पाने तोडून घेऊन शेताबाहेर जमिनीत पुरून टाकावीत किंवा योग्य उपाययोजना करून अळ्यांचा नायनाट करावा.
- या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकावर क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लिटर प्रति हेक्टर किंवा प्रोफेनोफॉस 1 लिटर प्रति हेक्टर किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 एस.सी. 500 मि.ली. प्रति हेक्टर किंवा क्लोरांट्रॅनीलिप्रोल 18.5 एस.सी. 150 मि.ली. प्रति हेक्टर यापैकी एका कीटकनाशकाची आलटून पालटून 500 लिट्रर पाण्यात मिसळून फवारणी करावी.