हॅलो कृषी ऑनलाईन: आजकालचे तरुण काहीतरी नवीन आणि हमखास उत्पन्न (Success Story) देणार्या व्यवसायाकडे वळताना दिसतात. असाच एक तरुण आहे, ज्याने मेहनत, जिद्द यांच्या बळावर मशरूम व्यवसाय नुसता सुरू केला नाही तर आज या व्यवसायातून महिन्याला तब्बल आठ लाखांचे उत्पन्न घेत आहे (Success Story).
बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टीसारख्या दुष्काळी भागात बेलगाव येथील या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे, महादेव सूर्यभान पोकळे. याने मशरूम बियाण्यांचा (Mushroom Seeds Business) यशस्वी प्रयोग केलेला आहे (Success Story).
पोकळे यांच्या या मशरूमला देशातच नव्हे तर विदेशातदेखील मोठी मागणी असून, या माध्यमातून महिन्याकाठी आठ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. महादेव पोकळे (Mahadev Pokale) हे ३२ वर्षांपासून विविध प्रकारचे मशरूमचे बीज (Types Of Mushroom) तयार करत असून, आष्टी येथे एक वर्षांपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे.
महादेव पोकळे हे उच्चशिक्षित असून, त्यांनी सुरुवातीला हैदराबाद आणि बारामती येथे मशरूम कल्चर (Mushroom Culture) कंपनीत काम केले. त्यानंतर कालांतराने आळंदी येथे एका मित्राच्या मदतीने दोघात हा व्यवसाय (Mushroom Business Yashogatha) सुरू केला. पण, कोरोना काळात मित्र मयत झाल्याने त्यांनी पुणे सोडले आणि गाव गाठले.
आता गत वर्षापासून आष्टी येथे त्यांनी मशरूम बीज बनविण्याचे काम सुरू केले. महिन्यासाठी पाचशे किलो बीज तयार केले जाते. यासाठी लागणारे कल्चर (विरजण) हे अमेरिका येथून दिल्लीला येते आणि तिथून पुण्यात आणले जाते. नंतर आष्टीत आणले जाते. वीस किलो मशरूम आणल्यानंतर कल्चर तयार करून त्याला एसी मध्ये ठराविक तापमान देऊन मशरूम तयार केले जाते.
वीस किलो कल्चरचे वीस टन उत्पादन होते. यातून महिन्यासाठी साधारण आठ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल (Success Story) देखील होते. पोकळे यांच्या या प्रकल्पात 15 महिला व 10 पुरुष अशा 25 जणांना रोजगारही मिळत आहे.
काय मिळतो मशरूमला भाव? (Mushroom Rate)
मशरूमला ग्रामीण भागात 100 ते 300 रुपये व देश-विदेशात 20 हजारापासून तीन लाख रुपये किलोपर्यंतचा भाव मिळण्याची शक्यता आहे.
मशरुमला मोठ्या शहरांमध्ये मागणी
ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि उलाढाल चांगली राहावी यामुळे आपल्या भागात हा प्रयोग सुरू केला. या प्रयोगाला यश मिळत असल्याचे चित्र सध्या आहे.
येथील मशरूमला कर्नाटकच्या बंगळूरू, मध्य प्रदेशातील इंदूर, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रात लातूर व इतर ठिकाणी मागणी असल्याचे महादेव पोकळे (Success Story) सांगतात.