हॅलो कृषी ऑनलाईन: आजकाल बहुतेक तरुणांना कमी वयातच पैसा कमावण्याची (Success Story) इच्छा असते. काही जणांना परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागतो तर काही जण व्यवसाय करण्याची इच्छा आणि जिद्द यामुळे कमी वयातच व्यवसायाकडे वळतात आणि यातून मोठा नफा कमवतात. आज आपण अशाच एका युवकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने कमी वयातच यशाकडे (Success Story) मार्गक्रमणास सुरुवात केली.
उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी येथील शेतकरी अजित कुमार असे या तरुणाने मधमाशी पालनातून (Beekeeping) कोट्यावधी रुपये मिळवले आहेत.
वर्षाला मधमाशी पालनातून एक कोटी रुपयांची उलाढाल (Success Story)
अजितने वयाच्या 16 व्या वर्षी फक्त पाच पेट्या घेऊन मधमाशीपालनाला सुरुवात केली आज या लहान व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. 5 पेट्या पासून सुरु झालेला हा व्यवसाय आजच्या घडीला 2000 बॉक्स वितरित करण्यापर्यंत पोहोचला आहे. या व्यवसाय त्यांच्यासाठी एवढा फायदेशीर ठरला की यातून ते वर्षाला कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवत आहेत.
कृत्रिम प्रजननातून मध उत्पादनात वाढ
अजित कुमारने दिलेल्या माहितीनुसार, ते एका पेटीतून सुमारे 50 किलोपर्यंत मध तयार करतात. त्यांनी त्यांच्या मधमाशीपालन व्यवसायाची व्याप्ती (Success Story) हळूहळू वाढवली आहे.
परंतु 2021 मध्ये जेव्हा त्यांचे उत्पादन निम्म्यावर आले, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात निराशा आली. त्यांना खर्च भागवणे सुद्धा कठीण झाले होते. त्यांनी मग हे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले.
अजितने अमेरिका आणि चीनमधील मधमाशीपालकांशी ऑनलाइन संपर्क साधला आणि व्हॉट्सॲप मेसेंजरद्वारे प्रशिक्षण घेतले. भारतात 2022 मध्ये पहिले कृत्रिम राणी गर्भाधान (Artificial Bee Breeding) थेट स्थापित केले गेले. कृत्रिम प्रजननातून मध उत्पादनात वाढ झाल्याची माहिती अजित कुमार यांनी सांगितली.
दरवर्षी 200 टन मध निर्मिती (Success Story)
ज्यावेळी मधाचे उत्पादन कमी झाले, त्यावेळी अजित निराश झाला नाही. त्याने काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले. कमी झालेल्या मध उत्पादनाची भरपाई केली आणि उत्पादन वाढवण्यासाठी भारतात राणी मधमाशीच्या कृत्रिम रेतनाची पहिली प्रयोगशाळा विकसित केली. राणी मधमाशीच्या (Queen Honey Bee) कृत्रिम रेतन प्रक्रियेमुळे अजित आज लाखो रुपयांची कमाई करत आहे. दरवर्षी अजित सुमारे 200 टन मध तयार करतो आणि बाजारात विकतो. त्यामुळे त्यांना दरवर्षी 80 ते 85 लाख रुपयांची कमाई होत आहे. यामध्ये वर्षाला सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. तरुण शेतकरी अजित कुमार हे या व्यवसायात अनेकांना रोजगारही देत आहेत. तसेच, वेगवगेळ्या चवीचा मध (Different Flavors Of Honey) सुद्धा तयार करत आहेत. ज्यामध्ये लिची, रेठी, रोझवूड, निलगिरी, कडुलिंब, बाभूळ, तुळस यांच्यासह सुमारे डझनभर चवींचा मध मिळतो.
500 रुपये किलोने मधाची विक्री (Success Story)
मोठ्या मध उत्पादक कंपन्या प्लांटमध्ये येऊन मधाची खरेदी करत असल्याची माहिती अजित कुमार यांनी दिली. बाजारात मधाची किंमत 500 रुपये प्रति किलो आहे. मधमाशी पालनासाठी अशी जागा निवडा जिथे पुरेशी फुले असतील. मधमाश्यांना शांत ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. मधमाशीपालन करून तुम्ही दरवर्षी लाखोंचा नफा कमवू शकता. असे केल्याने तुमचा खर्च कमी होईल आणि तुमचा नफाही (Success Story) खूप होईल.